लग्न, कुटुंब, मुलं हवंय; घटस्फोटानंतर अभिनेत्याची एक्स पत्नी तथा अभिनेत्री नव्या जोडीदाराच्या शोधात
बॉलिवूड असो किंवा टीव्ही इंडस्ट्री अफेअर आणि घटस्फोटाच्या चर्चा या नेहमी सुरुच असतात. अशाच एका अभिनेत्याच्या एक्स पत्नी तथा अभिनेत्रीचं वक्तव्य त्यांच्या घटस्फोटानंतर व्हायरल होत आहे. हे कपल टीव्ही इंडस्ट्रीमधलं नावाजलेलं कपल होतं. घटस्फोटानंतर अभिनेत्याने दुसरं लग्नही केलं पण अभिनेत्री मात्र अजूनही सिंगलच आहे. तिने लग्नाबाबत केलेलं एक वक्तव्य आता चांगलंच व्हायरल होतं आहे.
अभिनेत्री पुन्हा डेटिंग करण्यास उत्सुक
हा अभिनेता बिग बॉस 18 चा उपविजेता ठरलेला विवियन डिसेना आहे. तो अनेक बिग बॉसपासून अनेक कारणांनी चर्चेत आला. आता त्याची पहिली पत्नी तथा अभिनेत्री वाहबिज दोराबजी सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर वाहबिज दोराबजीला पुन्हा प्रेमात पडायचं आहे आणि ती पुन्हा डेटिंग करण्यास उत्सुक आहे. वाहबिजने पुन्हा कुटुंब हवी असण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
एका मुलाखतीत वाहबिज दोराबजीने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने सांगितलं. तिने सांगितलं की, एकटे राहणे किती कठीण आहे आणि म्हणूनच तिला पुन्हा लग्न करायचं आहे.
‘ज्याच्यासोबत मी कुटुंब बनवू शकेन…’
टीव्ही अभिनेत्री वाहबिज दोराबजी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते आणि अलीकडेच ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलली. वाहबिज म्हणाली, ‘सध्या मी अविवाहित आहे, पण निश्चितच मी अशा व्यक्तीच्या शोधात आहे ज्याला मी डेट करू शकेन, लग्न करू शकेन आणि मला मुलेही हवी आहेत, ज्याच्यासोबत मी कुटुंब बनवू शकेन. आणि मी देखील याबद्दल खूप उत्सुक आहे.’
घटस्फोटानंतर अभिनेत्याने केलं दुसरं लग्न
वाहबिज दोराबजीने 2013 मध्ये लोकप्रिय टीव्ही अभिनेता विवियन डिसेनाशी लग्न केलं होतं. वाहबिजची ‘प्यार की ये एक कहानी’च्या सेटवर विवियनसोबत भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री आणि मग प्रेम फुललं. ते रिलेशनशिपमध्ये येताच, काही काळानंतर दोघांनीही लग्नही केलं. तथापि, 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि आता दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. विवियनने इजिप्तमधील पत्रकार नूरन अलीशी लग्न केलं. त्यांना आता एक मुलगी देखील आहे. तर दुसरीकडे घटस्फोटानंतर, वाहबिजने तिच्या करिअरवर तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित केलं.
“घटस्फोटानंतर खूप काही बदललं…”
वाहबिज प्रथम मॉडेल होती, नंतर ती अभिनेत्री बनली आणि आज ती एक यशस्वी व्यावसायिक महिला आहे. तिच्या आयुष्याबद्दल बोलताना वाहबिज म्हणाली, ‘घटस्फोटानंतर खूप समस्या आल्या पण आता खूप काही बदललं आहे जे खूप चांगले आहे.’ माझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यात नशिबाची मोठी भूमिका आहे आणि मी ज्या ज्या मालिकांमध्ये सहभागी झालो आहे ते सर्व हिट झाले आहेत. देवाने मला हे सर्व दिले याबद्दल मी खूप आभारी आहे आणि भविष्यातही मी चांगले काम करेन.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List