Chandrapur News – शहरातील विविध वार्डात भीषण पाणीटंचाई, रोज 180 टँकर फेऱ्या; प्रशासन ढिम्म

Chandrapur News – शहरातील विविध वार्डात भीषण पाणीटंचाई, रोज 180 टँकर फेऱ्या; प्रशासन ढिम्म

सुमारे बाराशे ते चौदाशे मिलिमीटर वार्षिक पर्जन्यमान असलेल्या चंद्रपुरातही पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. चंद्रपूर शहर मनपा शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांच्या वार्डातही टँकरने पाणीपुरवठा करत आहे. शहराचा पाणीपुरवठा इरही धरण आणि इरई नदी या दोन स्त्रोतांमधून होतो. मात्र अमृत पाणीपुरवठा योजनेचा दुसरा टप्पा संथ गतीने राबविला जात असल्याने शहराच्या निम्म्या भागात पाणीटंचाई भेडसावत आहे.

शहराच्या अनेक भागात बोअरवेल तळाला गेल्या आहेत. परिणामी नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मनपाच्या आठ व खासगी चार अशा बारा टँकरच्या माध्यमातून पाणीटंचाई असलेल्या वडगाव, लक्ष्मीनगर, हवेली गार्डन परिसर, जगन्नाथ बाबा वार्ड, रमाईनगर, अष्टभूजा वार्ड, बाबूपेठ, नगिनाबाग, घुटकाळा, गुलमोहर, महाकाली कॉलरी, अंचलेश्वर गेट, राष्ट्रवादी नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, जटपुरा गेट, कृष्ण नगर, इंदिरा नगर यासह अन्य भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. वार्डांमध्ये 180 टँकर फेऱ्याद्वारे तहान भागविली जात आहे. शहराच्या एकूण 90 ठिकाणी तात्पुरत्या पाणी टाक्या उभारून नागरिकांना पाणी पुरविले जात आहे. असे असले तरी शहरात पाणीटंचाई आहे, हे मानायला प्रशासन तयार नाही. नागरिक मात्र कधी मनपाच्या टँकरची वाट बघत तर, कधी पैशाने पाणी विकत घेत आलेला दिवस पुढे ढकलत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्यूड सीन शूट करण्यापूर्वी दिग्दर्शकाने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला पाजली होती दारू; वारंवार रिटेक होत राहिले… न्यूड सीन शूट करण्यापूर्वी दिग्दर्शकाने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला पाजली होती दारू; वारंवार रिटेक होत राहिले…
बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींना इंटिमेट सीन्ससाठी मानसिक तयारी करावी लागते. काहीजण ते अगदी सहजपणे करतात तर काहीजणांना सुरुवातीला असे सीन्स करणे थोडे...
Operation Sindoor नंतर पाकिस्तानचा सीमेवर तुफान गोळीबार, पूँछमधील 15 नागरिकांचा मृत्यू, 43 जखमी
Photo – लाडक्या बहीणींची फसवणूक; शिवसेना महिला आघाडीचा मुंबईत मोर्चा
Operation Sindoor – सीमावर्ती राज्यांमध्ये हाय अलर्ट, निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द
Ratnagiri – हल्ला… सायरन वाजताच जखमींच्या मदतीसाठी रुग्णवाहिका धावल्या, रत्नागिरीत मॉकड्रील
‘मला माझ्या शरीराची किळस येतेय’, करण जोहरने व्यक्त केली वेदना, म्हणाला ‘मी कपड्यांशिवाय आरशात नाही…’
Mockdrill नाशिकमध्ये हवाई हल्ल्याचा थरार, बचाव कार्याचे मॉक ड्रील तीस मिनिटांत पूर्ण