भाजप नेत्याच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, स्वत:वर गोळी झाडून संपवलं जीवन

भाजप नेत्याच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, स्वत:वर गोळी झाडून संपवलं जीवन

एका भाजप नेत्याच्या पत्नीने स्वतःवर गोळी झाडून आपले जीवन संपवले आहे. अन्न शिजवण्यावरून सासू सुनेत भांडण झाले. या भांडणात पतीने आईला साथ दिली. त्यामुळे याच रागात येऊन पीडित महिलेने पतीच्या परवानाधारक पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशात लखनऊमध्ये ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नवी कोट नंदा परिसरातील आहे. अतुल सिंह चौहान हे भाजप नेते असून व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर आहेत. अतुल सिंह चौहान यांनी भाजपकडून नगरसेवकपदाची निवडणूकही लढवली आहे. अतुल आणि गुंजाचे लग्न 2016 मध्ये झाले. दोघांनाही सात वर्षांची मुलगी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल मंगळवारी कामावर गेले होता. यावेळी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास, पत्नी गुंजन सिंह (वय वर्षे 28) हिने तिच्या पतीला व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून घरी जेवायला येण्याचा मॅसेज केला.

व्हॉट्सअॅपवर मेसेज आल्यानंतर अतुल काही वेळातच घरी पोहोचले. त्यानंतर गुंजनने तिच्या नवऱ्याला आणि सासूलाही जेवण वाढले. यावेळी सासूला मधुमेह असल्यामुळे तिने ताटात वाढलेल्या शिळ्या भाताबद्दल गुंजनला विचारले. यावेळी अतुल यांनी देखील तिला जाब विचारला. त्यामुळे गुंजनला राग आला आणि ती तडकाफडकी त्यांच्या खोलीत निघून गेली. आणि त्याच रागात गुंजनने नवऱ्याची पिस्तूल काढून स्वत: गोळी झाडली.

गुंजन तिच्या खोलीत गेल्यानंतर काही मिनिटांतच गोळीबाराचा आवाज आला. त्यामुळे अतुल लगेचच खोलीत पोहोचले. तेव्हा गुंजन रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. हे पाहून अतुल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गुंजनला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी गुंजनला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनीही या घटनेची दखल घेतली आहे. अतुलच्या पिस्तूलचा परवाना रद्द करण्यासाठी पत्र पाठवले जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मालेगाव खटल्याच्या निकालापूर्वी साध्वी प्रज्ञा सिंह यांची एका वाक्यात प्रतिक्रिया…निकालाबाबत कोर्टात काय घडले? मालेगाव खटल्याच्या निकालापूर्वी साध्वी प्रज्ञा सिंह यांची एका वाक्यात प्रतिक्रिया…निकालाबाबत कोर्टात काय घडले?
मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या स्फोटाच्या खटल्याचा निकाल तब्बल १७ वर्षांनी गुरूवारी ८ मे रोजी जाहीर होणार होता. यापूर्वी, १९ एप्रिल...
घटस्फोटानंतर 4 वर्षांनी समांथा विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात,नात्याची कबुली? म्हणाली ,’नवीन सुरुवात…’
घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच मोकळेपणे व्यक्त झाला स्वप्निल; म्हणाला “तिसऱ्या व्यक्तीला कधीच..”
Operation Sindoor – आणखी अ‍ॅक्शन दिसणार! कारवाईसाठी हवाई दलाला पूर्ण मोकळीक; NSA डोवल अचानक पंतप्रधान मोदींना भेटले
दिल्लीतील अंतराळ संशोधन परिषदेत NASA अनुपस्थित, काय आहे कारण? वाचा सविस्तर
Operation Sindoor Update – ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; सर्वपक्षीय बैठकीनंतर हिंदुस्थानची गर्जना
Big Breaking- रावळपिंडीतील पाक सैन्याच्या मुख्यालयात भीषण स्फोट