मोठी बातमी! ठाकरे बंधूंकडून युतीचे संकेत, मनसेचा बडा नेता नाराज, म्हणाला अशी अभद्र…

मोठी बातमी! ठाकरे बंधूंकडून युतीचे संकेत, मनसेचा बडा नेता नाराज, म्हणाला अशी अभद्र…

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वापुढे भांडणं, वाद या क्षुल्लक गोष्टी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या या वक्तव्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘मी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी मी एकत्र यायला तयार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या भूमिकेचं शिवसैनिकांकडून आणि काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून देखील स्वागत होत आहे. मात्र मनसे नेते अमेय खोपर यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. ‘अशी अभद्र युती होऊ नयेत, हीच ईश्वर चरणी प्रार्थना’ असं खोपकर यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? 

युतीसंदर्भात बोलताना राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.  “कुठल्याही मोठ्या गोष्टी, आमच्यातले वाद, आमची भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्त्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी ही भांडणं, वाद अत्यंत क्षुल्लक गोष्टी आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं या फार कठीण गोष्टी आहेत, असं मला वाटत नाही,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील युतीचे संकते देण्यात आले आहेत.  मी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी मी एकत्र यायला तयार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून देखील राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं स्वागत करण्यात आलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;