3 दिवस कुजत राहिला काजोलच्या आजीचा मृतदेह, वयाच्या 84 व्या वर्षी हृदयद्रावक अंत

3 दिवस कुजत राहिला काजोलच्या आजीचा मृतदेह, वयाच्या 84 व्या वर्षी हृदयद्रावक अंत

बॉलिवूडमधील पैसा, ग्लॅमर, प्रसिद्धीचं आकर्षण अनेकांना असतं. पण बॉलिवूडसारखी निर्दयी दुनिया दुसरी कोणतीच नाही. याला कारण देखील तसंच आहे. एकेकाळी प्रसिद्धीझोतात असलेली अभिनेत्री अचानक एकटी पडते, शेवटच्या घटिका मोजताना तिच्यासोबत कोणीच नसतं… तीन दिवस मृतदेह खोलीत कुजतो… त्यांनंतर पोलीस अभिनेत्रीच्या कुटुंबियांना तिच्या निधनाबद्दल सांगतात… हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि अशा अभिनेत्रीचा हृदयद्रावक शेवट होतो जी नात्याने अभिनेत्री काजोल हिची लांबची आजी लागते… अभिनेत्रीच्या निधनाची बातमी कळल्यानंतर काजोल आणि आई तनुजा यांना देखील धक्का बसतो… सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, जिने 50 व्या दशकात बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्या अभिनेत्रीचं नाव आहे नलिनी जयवंत…

फार कमी लोकांनी काजोलची आजी आणि अभिनेत्री नलिनी जयवंत यांच्याबद्दल माहिती आहे. असं सांगतात की, नलिनी यांच्या सौंदर्यापुढे अभिनेत्री मधुबाला यांचं सौंदर्य देखील फेल होतं. 50 च्या दशकात नलिनी यांनी अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

काजोल आणि नलिनी जयवंत यांचं नातं

नलिनी जयवंत नात्याने काजोल हिच्या आजी होत्या. काजोलची आजी शोभना समर्थ या नलिनी जयवंत यांच्या बहीण होत्या. शोभनाला पाहिल्यानंतर नलिनी यांना अभिनयाची आवड निर्माण झाली आणि हिंदी सिनेविश्वात पाऊल ठेवताच त्यांनी एक यशस्वी अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

नलिनी जयवंत यांचं खासगी आयुष्य

नलिनी जयवंत यांनी दोन वेळा लग्न केलं. पण त्यांना आयुष्यात कधी मातृत्वाचं सुख अनुभवता आलं नाही. नलिनी यांचं पहिलं लग्न चिमनलाल यांचे पूत्र वीरेंद्र देसाई यांच्यासोबत झालं होतं. पण त्यांचं लग्न फक्त तीन वर्ष टिकलं. पहिलं लग्न मोडल्यानंतर नलिनी यांच्या आयुष्यात अभिनेते अशोक कुमार यांची एन्ट्री झाली. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं.

अखेर अशोक आणि नलिनी यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी एकमेकांना जवळपास 7 वर्ष डेट केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलं. अशात पहिल्या लग्न मोडल्यानंतर, बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर नलिनी यांनी दुसरं लग्न प्रभूदयाल यांच्यासोबत केलं. प्रभूदयाल आणि नलिनी यांना देखील मुल झालं नाही. पण दोघांचं आयुष्य फार आनंदी होतं. दोघे एकमेकांसोबत आनंदी होते.

उतार वयात देखील दोघांनी एकमेकांची साथ कधी सोडली नाही. दोघे कायम एकमेकांची काळजी घ्यायचे. पण प्रभूदयाल यांच्या निधनानंतर नलिनी पूर्णपणे खचल्या होत्या. दुनियादारीत त्यांचं मन देखील रमत नव्हतं. त्यांनी स्वतःला सर्वांपासून दूर केलं आणि एकट्याच राहू लागल्या.

नलिनी यांचे शेजारी म्हणायचे, पतीच्या निधनानंतर त्या क्वचितच घराबाहेर पडायच्या. अखेर नलिनी यांनी देखील 22 डिसेंबर 2010 मध्ये अखेरचा श्वास घेतला. पण त्यांच्या निधनाबद्दल कोणालाच कल्पना नव्हती. तब्बल तीन दिवस त्यांचा मृतदेह त्यांच्या घरात कुजत राहिला. परिसरात दुर्गंधी येऊ लागल्यानंतर अखेर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला आणि अभिनेत्रीच्या मृत्यूबद्दल कुटुंबियांनी सांगितलं. त्यानंतर जवळच्या व्यक्तींनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

नलिनी जयवंत यांचा मृत्यू अजूनही संशयास्पद मानला जात आहे परंतु याप्रकरणी पोलिसांनी कोणताही गुन्हा नोंदवला नाही. रिपोर्टनुसार, काजोललाही तिच्या आजीच्या मृत्यूची बातमी खूप दिवसांनी कळली. नलिनी जयवंत यांचा मृत्यूचं रहस्य अद्याप गुलदस्त्यात असलं तरी, त्यांनी जवळजवळ 2 दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. नलिनी यांनी दोन दशकांच्या कारकिर्दीत 60 सिनेमांमध्ये काम केलं, त्यापैकी बरेच सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

…तर मला त्यांचा अभिमान, अमृता फडणवीस यांनी पीएम मोदी यांचे केले कौतूक …तर मला त्यांचा अभिमान, अमृता फडणवीस यांनी पीएम मोदी यांचे केले कौतूक
मला खूप आनंद आहे की आपण WAVES 2025 परिषदे सारखा उपक्रम राबवला आहे, आज त्याचा तिसरा दिवस आहे मला वाटते...
‘…म्हणजे विषयच संपला’, पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना उदयनराजेंचा संताप, केली मोठी मागणी
WAVES 2025ला सैफ अली खानची हजेरी, म्हणाला ‘रामायण महाभारत…’
आमची मैत्री जुनी आहे, पण मी त्याच्याकडे काही मागत नाही, शिंदे यांच्याकडे पाहात नानांचा डायलॉग
फुलेरामध्ये निवडणूक, ‘पंचायत’च्या चौथ्या सीजनचा Teaser प्रदर्शित
पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाला जागा देण्यास 7 गावांचा विरोध, पोलिसांच्या लाठीमारामुळे महिलेचा हार्टॲटॅकने मृत्यू
पंतप्रधानांचे 44 परदेश दौरे, पण मणिपूरमध्ये एक सेकंदही घालवला नाही; मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींवर निशाणा