अवघ्या सात सेकंदांत समजणार हृदयविकार, 14 वर्षांच्या सिद्धार्थने लावला एआय अ‍ॅपचा भन्नाट शोध

अवघ्या सात सेकंदांत समजणार हृदयविकार, 14 वर्षांच्या सिद्धार्थने लावला एआय अ‍ॅपचा भन्नाट शोध

हिंदुस्थानी वंशाच्या 14 वर्षीय सिद्धार्थ नंद्याला याने एआय अ‍ॅपचा भन्नाट शोध लावला आहे. अ‍ॅपचे नाव आहे Circadian AI. फक्त सात सेकंदांच्या हार्ट साऊंड रेकार्डिंगवरून हृदयविकार ओळखणारे अनोखे अ‍ॅप आज जगभरात कौतुकाचा विषय ठरत आहे. ओरॅकल आणि एआरएम यांच्याकडून एआय सर्टिफिकेट प्रोफेशनल आहे. त्याला यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज, फ्रिस्को चेंबर ऑफ कॉमर्स यांच्याकडून पुरस्कार व सन्मानपत्रे मिळाली आहेत. सध्या सर्वच क्षेत्रांत एआयचा बोलबाला आहे. एआय जर अर्थ आणि मार्केटिंगमध्ये बदल घडवू शकतो, तर आरोग्य क्षेत्रात का नाही, हा विचार करून सिद्धार्थने कामाला सुरुवात केली. त्याने अवघ्या सात महिन्यांत Circadian AI अ‍ॅप तयार केले. या भन्नाट अ‍ॅपसाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडन यांनीदेखील सिद्धार्थचे कौतुक केले आहे.

हजारो रुग्णांवर चाचणी

सिद्धार्थने तयार केलेले अ‍ॅप हॉस्पिटलमध्ये वापरण्यासाठी असून फक्त सात सेकंदांत हृदयाच्या ठोक्याचे विश्लेषण करते. विश्लेषणातून 40 पेक्षा जास्त हृदयविकारांची शक्यता वर्तवते. याची अचूकता 96 टक्के असून हिंदुस्थान आणि अमेरिकेत मिळून 15 हजारांहून अधिक रुग्णांवर याची चाचणी करण्यात आली आहे. विजयवाडा आणि गुंटूर येथील हजारो रुग्णांवर चाचणी झाली असून यामध्ये ईसीजी व इकोच्या मदतीने अंतिम निदान करण्यात आलेय. त्यामुळे सुरुवातीच्या तपासणीसाठी हे अ‍ॅप महत्त्वाचे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;