प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडली, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडली, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

महाराष्ट्रातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. वळसंगकर यांनी टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.

सोलापुरातील राहत्या बंगल्यात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास वळसंगकर यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ वळसंगकर रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सोलापुरातील डीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये डॉ. वळसंगकर यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. पुढे शिवाजी विद्यापीठ तसेच लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर तेथूनच एमडी आणि एमआरसीपी पदवी मिळवली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;