मुंबईत यंदा जोरदार पाऊस बसरणार, सामान्यापेक्षा जास्त पावसाचा अंदाज

मुंबईत यंदा जोरदार पाऊस बसरणार, सामान्यापेक्षा जास्त पावसाचा अंदाज

Mumbai Weather : मुंबईकरांसाठी यंदा मान्सूनची चांगली बातमी आहे. मुंबई आणि उपनगरात चांगल्या पावसाचे संकेत आहे. मुंबईत सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागानुसार, जास्त पावसाचा अंदाज हा 65% आहे. हवामान विभागाचा अंदाज बरोबर ठरल्यास मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईसारख्या दाट लोकवस्ती आणि मोठी लोकसंख्या असलेल्या शहरात पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मुंबईला होणारा सर्व पाणी पुरवठा तलावांद्वारे केला जातो. तलावांमध्ये साचणारे पावसाचे पाणी वर्षभर मुंबईची तहान भागवते. यामुळे चांगला पाऊस पडला तर मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही.

प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर म्हणाल्या की, प्राथमिक अंदाजानुसार मुंबईत सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता 65% आहे. तथापि, हवामान विभागाकडून आणखी एक अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यात यंदाच्या मान्सून पॅटर्नबाबतची परिस्थिती अधिक स्पष्ट होईल.

हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार, यंदा मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून चांगलाच बरसणार आहे. राज्यातील सर्वच भागांत मान्सून सक्रीय असणार आहे. काही ठिकाणी सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक भागात अतिवृष्टीची शक्यता आहे.

मुंबईत तापमान घसरले

मुंबईच्या दिशेने वाहणारे वारे सक्रिय झाले आहेत. यामुळे मुंबई महानगरात दिवसाच्या तापमानात घट झाली आहे. मंगळवारी मुंबईत कमाल तापमान 36.2 अंश सेल्सिअस होते, परंतु बुधवारी ते 34.8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. मुंबईत तापमान कमी झाले असले तरी आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. मुंबईतील रात्रीच्या तापमानात कोणताही बदल झालेला नाही.

देशात कशी असणार परिस्थिती

  • सरासरीपेक्षा कमी पाऊस
  • जम्मू आणि काश्मीर, लडाख, तामिळनाडू, बिहार, ईशान्य भारतातील काही भाग
  • सामान्य ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस
  • मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कसाबला फाशीवर लटकवण्यात मोठा रोल; कोण आहेत देवेन भारती? कसाबला फाशीवर लटकवण्यात मोठा रोल; कोण आहेत देवेन भारती?
Mumbai Police Commissioner: वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती हे अतिरिक्त...
‘वडिलांनी मला धू धू धुतला असता..’; अशोक सराफ यांचा शाळेतील भन्नाट किस्सा
एजे-लीलाची जोडी हिट पण सीरिअल फ्लॉप; ‘नवरी मिळे हिटलरला’कडून चाहत्यांना धक्का
विक्की कौशल दर महिन्याला भरतो इतके लाख घरभाडे; तर 3 वर्षांचे इतके करोड
दहशतवाद्यांशी लढताना मुलाला आलेले वीरमरण, आता आईला जावं लागणार पाकिस्तानात
अपंग व्यक्तींसाठी eKYC प्रक्रिया सुलभ करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश!
हिंदुस्थानच्या CRPF जवानचं पाक तरुणीशी लग्न, व्हिसा रद्द झाल्याने मायदेशी परतावं लागणार