आगीचे लोळ होरपळवणार, पण अजून येणार मोठं अस्मानी संकट, आता होणार कहर, IMD चा इशारा काय?

आगीचे लोळ होरपळवणार, पण अजून येणार मोठं अस्मानी संकट, आता होणार कहर, IMD चा इशारा काय?

भारतीय हवामान विभागाने (IMD) यावर्षी देशभरात सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडेल, मान्सून (Monsoon) अधिक सक्रिय असेल असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे देशातील कृषी आणि अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळणार आहे. तर शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातील जनतेचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. देशातील 42 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे. तर शेतीचा भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) 18% वाटा आहे.

मे जूनमध्ये आगीचे लोळ

भारतीय हवामान विभागानुसार, भारतात पुढील दोन महिने खासकरून मे आणि जून खूप तापणार आहेत. त्यानंतर मान्सूनची एंट्री होईल. उत्तर भारतातील लोक मान्सूनची आतुरतेने वाट पाहतात. त्यांच्यासाठी आयएमडीने आनंदवार्ता दिली आहे. आयएमडी प्रमुख मृत्युंजय महापात्र यांनी मान्सून हंगामात जून ते सप्टेंबर या काळात सामान्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात सरासरीच्या 105% इतका पाऊस होण्याची शक्यता असून, 87 सेमी हा दीर्घकालीन सरासरीचा आकडा आहे.

एल नीनोचा प्रभाव नाही

भारतीय उपखंडात पावसाला आतापर्यंत एल नीनो या चक्रीवादळाने प्रत्येकवेळी खोडा घातला आहे. पाऊस कमी होण्याचे एल नीनो हे सर्वात प्रमुख कारण ठरले आहे. पावसाळा हा सामान्यपणे 1 जूनच्या जवळपास केरळमध्ये हजेरी लावतो. तर सप्टेंबर महिन्यापर्यंत तो सक्रिय असतो. केरळमध्ये प्रवेश करणारा पाऊस पुढे पश्चिमी घाटाच्या मार्गाने महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि दिल्लीत हजेरी लावतो. उन्हाळ्यात उन्ह कमी व्हावं अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. तर पावसाळ्यात जोरदार पावसाची प्रतिक्षा असते.

मुसळधार पाऊस

IMD नुसार, जेव्हा एखाद्या ठिकाणी 24 तासांत 204.5 मिमी अथवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो. तेव्हा त्याला मुसळधार पाऊस (Extremely Heavy Rainfall) म्हटले जाते. तर एखाद्या हवामान केंद्रावर एका दिवसात झालेला पाऊस त्या महिन्यातील अथवा ऋतुमधील सर्वाधिक नोंदवलेल्या प्रमाणाच्या जवळ असतो, तेव्हा अपवादा‍त्मक मुसळधार पाऊस (Exceptionally Heavy Rainfall) म्हणून त्याची नोंद होते. यंदा मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;