मोठा निर्णय आता शाळेतून शिवी हद्दपार, विद्यार्थ्याने शिवी दिली तर…

मोठा निर्णय आता शाळेतून शिवी हद्दपार, विद्यार्थ्याने शिवी दिली तर…

बदलापूरकरांनी मोठा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आता बदलापूरच्या सर्व शाळांमधून शिवी हद्दपार होणार आहे. विद्यार्थ्यांना चांगलं वळण लागवं, वाद टळावेत यासाठी बदलापूरमधील सर्व शाळांमधून शिवी हद्दपार करण्याचा कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्याने शिवी दिल्यास त्याचा दंड पालकाना भरावा लागणार आहे.

हल्ली शाळेत विद्यार्थ्यांच्या तोंडून सर्रासपणे शिव्या ऐकायला मिळतात. पण त्यांच्या तोंडातली ही शिवराळ भाषा काढून टाकण्यासाठी बदलापुरात ‘शिवी मुक्त शाळा’ हे अनोखं अभियान राबविण्यात येतं आहे. आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून आगामी शैक्षणिक वर्षात सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे.

बदलापूरच्या आदर्श शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या कार्यशाळेतून या अभियानाला सुरुवात झाली. अलीकडच्या काळात टीव्ही आणि मोबाईलचा वाढता प्रभाव, मुलांकडे पालकांचं होत असलेलं दुर्लक्ष, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिव्या देण्याचं प्रमाण वाढलं आहे. मुलं असभ्य वर्तन करू लागली आहेत. हे चित्र बदलण्यासाठी बदलापुरातल्या सर्व शाळांमध्ये शिवीमुक्त शाळा अभियान राबवलं जाणार आहे. यासाठी या सर्व शाळांमध्ये कडक नियमावली केली जाणार असून, मुलांच्या वर्तनावर शिक्षकांची नजर असणार आहे. मुलांनी शिवीगाळ केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल आणि हा दंड पालकांना भरावा लागेल. या अभियानामुळे मुलांवर निश्चितच चांगले संस्कार होतील, त्यांच्या भाषेचा दर्जा सुधारेल, एक सुजाण पिढी तयार करण्यासाठी हे अभियान पथदर्शी ठरेल, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला आहे.

…तर पालकांना दंड 

मुलांवर चांगले संस्कार घडावेत, शिवीगाळमध्ये अनेकदा वाद होतात हे वाद टळावेत यासाठी बदलापुरात हा उपक्रम राबवण्यात आला आहे, आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून आगामी शैक्षणिक वर्षात सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. मात्र तरी देखील जर विद्यार्थ्यानं शिवी दिली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, त्याचा दंड पालकांना भरावा लागणार आहे, असं निर्णय घेण्यात आला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;