एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या सरकारमध्ये…

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या सरकारमध्ये…

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण पगावर मिळाला नाही, यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे, विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी जोरदार टोला लगावला आहे, एकमेकांवर ढकलण्यापेक्षा  सरकार म्हणून काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी आपापसात ठरवलं पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

एकमेकांवर ढकलण्यापेक्षा, सरकार म्हणून काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी आपाआपसात ठरवलं पाहिजे. मी त्यांच्याकडे सरकार म्हणून बघत आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचऱ्यांचा हक्काचा पगार वेळेवर मिळाला पाहिजे. जेव्हा निवडणूक झाली त्या काळातील माझी भाषण काढा, सरकारमध्ये येणारे पैसे आणि खर्च होणारे पैसे याची तफावत आम्हाला दिसत होती. हे होणारच होतं, त्यामध्ये काही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्या महिलेची हत्या झाली असा माझा आरोप आहे, एक महिला साडेपाच तास कळा देत होती, तिचा रक्तस्त्राव झाला. अशावेळी जर तुम्ही तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं, तर ती हत्या नाही का? जर त्या महिलेला तिथेच ट्रीटमेंट देण्यात आली असती, तर ती माऊली आज आपल्यामध्ये असती. जेवढी जबाबदारी तिथल्या डॉक्टरची आहे, तेवढीच जबाबदारी तिथल्या हॉस्पिटलची सुद्धा आहे. हॉस्पिटलला यातून वेगळं करता येणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगशकर कुटुंबीयांवर टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना मी कुठल्याही कुटुंबाला नाव ठेवणार नाही, व्यक्तीमध्ये अडकायला नको,  हॉस्पिटल आणि डॉक्टर जे कोणी पाच दहा लोक त्यामध्ये इन्व्हॉल असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका असल्याचं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;