‘उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येणार तेव्हा कोंबडी..’, नारायण राणेंनी हॉटेल चालकांना काय सांगितलं?

‘उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येणार तेव्हा कोंबडी..’, नारायण राणेंनी हॉटेल चालकांना काय सांगितलं?

भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे ठेवू नका असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले नारायण राणे? 

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवा, असं आपण हॉटेल व्यवसायिकांना सांगितल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोकणाला काय दिले? केवळ मासे, मटण खाण्यासाठीच ते कोकणात यायचे, त्यामुळेच ते उद्धव ठाकरे आले की हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे ठेवायचे नाहीत, असं मी हॉटेल व्यावसायिकांना सांगितल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी चिपी विमानतळावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. चिपीला आता इंडिगो विमान पण येणार आहेत, आता चिपी विमानतळ बंद होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विमान देशात वेगवेगळ्या ठिकाणी जाईल, यासाठी माझा प्रयत्न आहे. लोकांनी प्रवास करावा, उद्योगधंदे वाढावेत यासाठी माझा प्रयत्न असल्याचंही  खासदार नारायण राणे यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दिशा सालियन प्रकरणात देखील त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. या प्रकरणात मला उद्धव ठाकरे यांचे दोन फोन आल्याचा दावा राणे यांनी केला होता, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून राणेंचा हा दावा फेटाळून लावण्यात आला होता. राणेंना जेव्हा अटक झाली तेव्हा उद्धव ठाकरेंना फोन आला होता, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. आता पुन्हा एकदा राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;