सावध रहा, मुंबईत सर्वात मोठी लाट या तारखेला येणार, हे १८ दिवस उधाण वाऱ्याचे

सावध रहा, मुंबईत सर्वात मोठी लाट या तारखेला येणार, हे १८ दिवस उधाण वाऱ्याचे

मुंबईत उन्हाचा तडाखा इतका वाढला आहे की यंदाचा मे महिना आणखीन उष्ण असणार या भीतीने मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे.या मुंबई आणि उपनगरात मुंबई महानगर पालिकेने रस्ते खोदून ठेवले असताना यंदा पावसाळा कसा जाणार याची भीती असतानाच आता मुंबईत जूननंतर १८ दिवस समुद्रावरील लांटाचे साम्राज्य असणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यंदा जुन महिन्यात सर्वात मोठी लाट येणार आहे. त्यामुळे यंदा पावसात समुद्र किनाऱ्यांवर जरा जपनूच रहावे लागेल असे म्हटले जात आहे.

मुंबईकरांना एप्रिल महिना उजाडला की मुलांच्या शाळांच्या परीक्षा झाल्या की गावी जाण्याचे वेध लागलेले असतात. त्यानंतर मात्र मुंबईकर शेतकऱ्यांसारखीच चातकासारखी पावसाची वाट पाहात असतात. कारण या असह्य उकाड्यातू पाऊसच त्यांची सुटका करणार असतो. मुंबईकरांसाठी आता हवामान खात्याने १८ दिवस उधाणाचे असल्याचे जाहीर केले आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात समुद्रात उधाण येणार आहे समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचे सूचना करण्यात आल्या आहेत.

२६ जून रोजी सर्वात मोठी लाट

यंदा १८ दिवस उधाणाचे असून या काळात समुद्रातील लाटा किती मीटर उंचीच्या असणार याची आकडेवारी जाहीर झाली आहे.या जून महिन्यात यंदा लाटांची उंची जास्त असणार आहे. समुद्रातील लाटा जास्त उंच असताना समुद्र किनारी कोणी जाऊ नये असे आवाहन केले आहे. मुंबईकर आणि पर्यटकांनी किनाऱ्यावर जाऊ नये असे आवाहन केले आहे. जून महिन्यात २६ जून रोजी  4.75 मीटरची लाट येणार आहे.

जूनमधील उधाणाचे दिवस दिनांक वेळ लाट उंची

24 स. 11.15 वा. 4.59 मीटर

25 दु.  12.05 वा. 4.71 मीटर

26 दु. 12.55 वा. 4.75 मीटर

27 दु. 13.40 वा. 4.73 मीटर

28 दु. 14.26 वा. 4.64 मीटर

जुलैमधील उधाणाचे दिवस

24 स. 11.57 वा. 4.57 मीटर

25 दु. 12.40 वा. 4.66 मीटर

26 दु. 13.20 वा. 4.67 मीटर

27 दु. 13.56 वा. 4.60 मीटर

ऑगस्टमधील उधाणाचे दिवस

10 दु. 12.47 वा. 4.50 मीटर

11 दु. 13.19 वा. 4.58 मीटर

12 दु. 13.52 वा. 4.58 मीटर

23 दु. 12.16 वा. 4.54 मीटर

24 दु. 12.48 वा. 4.53 मीटर

सप्टेंबरमधील उधाणाचे दिवस

8 दु. 12.10 वा. 4.57 मीटर

9 दु. 12.41 वा. 4.63 मीटर

10 दु. 1.15 वा. 4.59 मीटर

11 दु. 1.58 वा. 4.59 मीटर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;