Gudi Padwa 2025 : नवीन संधी, नव्या स्वप्नांची पूर्ती आणि आनंदाची उधळण; राज्यभरात नववर्षाचा उत्साह, ठिकठिकाणी शोभायात्राचे आयोजन

Gudi Padwa 2025 : नवीन संधी, नव्या स्वप्नांची पूर्ती आणि आनंदाची उधळण; राज्यभरात नववर्षाचा उत्साह, ठिकठिकाणी शोभायात्राचे आयोजन

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस. या दिवसांपासून मराठी नवीन वर्ष सुरु होतं. गुढीपाडवा म्हणजे हिंदू शास्त्रानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. हिंदू धर्मात गुढी पाडव्याला खूप महत्व आहे. राज्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने गिरगाव, ठाणे, डोंबिवली यांसह विविध परिसरात शोभायात्रा काढल्या जात आहेत. तसेच यानिमित्ताने महाराष्ट्रात सर्वत्र गुढी उभारुन, गोडाधोडाचे पदार्थ करुन नवीन वर्षाचा आनंद साजरा केला जात आहे. सध्या सर्वत्र चैतन्यमय वातावरण असते.

नववर्षाची महाराष्ट्रातील पहिली गुढी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या कळसावर उभारण्यात आली आहे. विधिवत पूजा करत देवीच्या महंत, पुजाऱ्यांनी ही गुढी उभारली. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी आजचा एक शुभ मुहूर्त असल्याने आणि मराठी नवीन वर्षाची आज सुरुवात होत असल्याने देवीची शिवकालीन दागिने घालून अलंकार पूजा करण्यात आली. देवीची पहाटे 5 वाजता आरती करुन तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर विधीवत पूजा करुन गुढी उभारण्यात आली. तुळजापूर मंदीरावर गुढी उभारण्यात आल्यानंतर तुळजापूर शहरात नागरिक गुढी उभी करतात.

गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मराठी नववर्षानिमित्त ठाण्यात शोभायात्रेला सुरुवात झाली आहे. श्री. कोपीनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी कौपिनेश्वर मंदिरातून स्वागतयात्रेला प्रारंभ झाल्यानंतर श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन पालखी मार्गस्थ होईल. या स्वागतयात्रेला जोड म्हणून ठाणे शहरात १२ उपयात्रा देखील निघणार आहेत.

मुख्य स्वागतयात्रेत ठाणे महापालिकेचा विशेष सहभाग असुन राज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्ताने चित्ररथ असणार आहे. त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण, प्लास्टीक बंदी, अवयवदान जागृती, मतदान जागृती आदी ७० चित्ररथांसह पालखी जांभळी नाका-रंगो बापूजी चौक या मार्गाने दगडी शाळेकडे निघून याचे रुपांतर भव्य स्वागतयात्रेत होणार आहे. ही स्वागतयात्रा पुढे आराधना सिनेमा, हरी निवास चौक, गोखले रोड पर्यंत येईल, पुढे राममारुती मार्ग, पु.ना. गाडगीळ चौक, तलावपाळी मार्गे पुन्हा श्री कौपीनेश्वर मंदिरात स्वागतयात्रेचा समारोप होईल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;