‘वाघ्या श्वान मी त्याला… ‘, वादात सदावर्तेंची उडी, संभाजीराजे छत्रपतींबद्दल केली मोठी मागणी

‘वाघ्या श्वान मी त्याला… ‘, वादात सदावर्तेंची उडी, संभाजीराजे छत्रपतींबद्दल केली मोठी मागणी

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून वादाची ठिणगी पडली आहे,   संभाजीराजे छत्रपतींनी काही पुराव्यांचा दाखला देत वाघ्याचे स्मारक तिथं नव्हते, असा दावा केला आहे. तर वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावर प्रतिक्रिया देताना भिडे गुरूजी यांनी म्हटलं की  संभाजीराजे भोसले बोलतात ते 100 टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलेली कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. यावरून वाद सुरू असतानाच आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील या वादात उडी घेतली आहे.

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? 

संभाजी भिडे गुरुजी यांचं या विषयावर चिंतन आहे, त्यांचं मी समर्थन करतो. वाघ्या श्वान आहे, मी त्याला कुत्रा म्हणणार नाही. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुरातत्व विभागाचा निर्णय विचारात न घेता समाधी निष्कासित करण्याची मागणी केली.  त्यांनी राजीनामा दिला पाहिजे,  त्याकाळी फुलेंनी समाधी शोधली, टिळकांनी, होळकरांनी जे काम केलं ते इतर घराण्यांनी काम का नाही केले? असं म्हणत त्यांनी यावेळी अप्रत्यक्षरित्या भोसले घराण्यावर देखील निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना सदावर्ते यांनी म्हटलं की, राज्यपालांना विनंती करेल की संभाजीराजे छत्रपती यांना पदावरून बाजुला करावं, त्यांनी कोणता रिसर्च पेपर काढला आहे, यावर? या मुद्द्यावर आम्ही माहिती गोळा करत असून, पंतप्रधान मोदींसमोर हा विचार ठेऊ. प्राधिकरणाने आतापर्यंत काय कार्य केले? त्यासंदर्भात चौकशीची मागणी न्यायालयात करू,असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले? 

वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘यासंदर्भात सर्वांशी चर्चा करावी लागेल या स्मारकाकरीता होळकरांनी देखील पैसे दिले होते. त्यामुळे थेट पुतळा काढण्यावरून समाजात वाद निर्माण होऊ शकतो. इतकी वर्षे झाली तो वाघ्याचा पुतळा तिथे आहे. त्यामुळे त्याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल,  असं फडणीस यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;