दिशा सालियनच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध? वकिलांचा पहिल्यांदाच मोठा खुलासा

दिशा सालियनच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध? वकिलांचा पहिल्यांदाच मोठा खुलासा

दिशा सालियन प्रकरणात हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान दिशा सालियन प्रकरणात मोठं ट्विस्ट निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिशाच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते, ती त्यांना पैसे द्यायची त्यामुळे दिशाला नौराश्य आलं होतं असा दावा करण्यात येत आहे. यावर आता सतिश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले निलेश ओझा? 

‘दिशाच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते, ती त्यांना पैसे द्यायची, त्यातून ती निराश होती. हे सारं मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये लिहिल्याचा दावा केला जात आहे. मात्र जर तो रिपोर्ट मुंबई पोलिसांनी मागे घेतला आहे, तर मग तो वैध कसा? त्यातील गोष्टींना काही अर्थच उरत नाही, त्यानंतर एसआयटीची स्थापना झाली आणि नव्यानं तपास सुरू झाला आहे. त्यामुळे या रिपोर्टचा काहीही फायदा होणार नाही, मालवणी पोलिसांनी किती खोटे पुरावे तयार केलेत यासाठी त्यांना नोबल पुरस्कार मिळायला हवा,’ असं सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुखांचा आरोप 

दरम्यान या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील मोठा दावा केला आहे. दिशा सालियन प्रकरणात क्लोजर रिपोर्ट आला आहे. आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र सुरू आहे. मी गृहमंत्री असल्यापासून सांगत आहे, की हे एक षडयंत्र आहे, आणि हेच सत्य आहे, असं या प्रकरणावर बोलताना अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.  या प्रकरणावरून आरोप -प्रत्यारोपाला उधाण आलं आहे, या प्रकरणात बोलताना भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या आरोपांना आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;