Sanjay Raut : ज्या दिवशी मोदी-शहांचं छत्र तुमच्यावर नसेल, ते छप्पर उडेल तेव्हा… संजय राऊतांनी शिंदेंना सुनावलंच
एकनाथ शिंदे यांच्या जीवनामध्ये कृतज्ञता हा शब्द असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंशी कृतज्ञ असलं पाहिजे. तुम्ही सोडून गेलात, तुमचे मतभेद झाले आहेत, तुम्ही आमच्यावर टीका करता, आम्ही तुमच्यावर करतो,पण ज्या प्रकारची भाषा ते ( शिंदे) उद्धव ठाकरेंबद्दल वापरता, त्यांनी स्वत:चं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ज्या दिवशी मोदी-शहांचं छत्र तुमच्यावर नसेल, ते छप्पर उडेल तेव्हा तुम्ही कुठे असाल? हा विचार शिंदे आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत किंवा गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरांच्या गाभाऱ्यात बसून करायला हवा, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना थेट सुनावलं.
आज एकनाथ शिंदे हे स्वत:चं जे आर्थिक, सत्तेचं वजन दाखवत आहेत, त्याचं मूळ उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उर्जेमध्ये आहे ना. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला उर्जा दिली नसती तर… ही अशी उर्जा त्यांना देऊ नका, हा माणूस घात करेल हे सांगणारे लोकं आज त्यांच्याच ( शिंदेच्या) अवतीभवती आहेत ठाण्यातले. ठाण्यात जे आमदार , खासदार आहेत ना आसपासचे, हे सगळे उद्धव ठाकरेंना ‘मस्के’ लावायला आले होते, असे म्हणत राऊतांनी निशाणा साधला.
साहेब हे करू नका, हा माणूस ( शिंदे) तुम्हाला दगा देईल, याची नियत चांगली नाही, हे सांगणारे लोकंच आज त्यांच्या भोवती आहेत. आम्ही त्याला साक्षीदार आहोत, असा दावा करत एकनाथ शिंदेंनी जपून पावलं टाकावी, असेही राऊत म्हणाले.
ही बातमी अपडेट होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List