दिशा सालियन प्रकरणात मोठं ट्विस्ट; सतीश सालियन यांचं आतापर्यंतचं सर्वात मोठं वक्तव्य

दिशा सालियन प्रकरणात मोठं ट्विस्ट; सतीश सालियन यांचं आतापर्यंतचं सर्वात मोठं वक्तव्य

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. या प्रकरणात त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. दिशा सालियन प्रकरणात तिच्या वडिलांवर दबाव होता असा आरोप करण्यात येत आहे. मात्र याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले सतीश सालियन?  

मागच्या पाच वर्षांमध्ये तुमच्यावरती दबाव होता का? आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर तुम्ही सर्व सांगितलं होतं तर तुम्ही गप्प का असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की नेमकं काय घडलं याची कल्पना मला नव्हती, मला हे सर्व नंतर काळलं. मला आधीपासून या प्रकरणातील पुराव्यांबाबत माहिती नव्हती. हे सर्व पुरावे एक -दोन वर्षांमध्ये समोर आले आहेत. मी एसआयटीला म्हटलं होतं की, तुम्हाला जी काही कारवाई करायची आहे ती करा. माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता असं सतीश सालियन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज सतीश सालियन यांनी या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी पोलीस आयुक्तांकडे नेमकी काय मागणी केली याबाबत त्यांचे वकील निलेश ओझा  यांनी माहिती दिली आहे.  ‘दिशाचे वडील सतीश सालियान यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली. आदित्य ठाकरेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. परमबीर सिंग, सचिन वाझेलाही आरोपी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे’,  असं यावेळी निलेश ओझा यांनी म्हटलं आहे.

आरोप -प्रत्यारोपाला उधाण 

या प्रकरणात सतीश सालियन यांनी जी याचिका दाखल केली आहे, त्या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला उधाण आलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;