ज्या स्टुडिओत रेकॉर्ड झाला कुणाल कामरा याचा शो, तेथे चालला हातोडा, पालिकेने केली ताबडतोब कारवाई

ज्या स्टुडिओत रेकॉर्ड झाला कुणाल कामरा याचा शो, तेथे चालला हातोडा, पालिकेने केली ताबडतोब कारवाई

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक व्हीआयपींवर आपल्या पॅरीडी साँगमधून स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी टीका केल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. काल रात्रीच अंधेरी एमआयडीसीतील हॉटेल युनी कॉन्टीनेन्टल हॉटेलात जाऊन शिवसैनिकांनी संपूर्ण शोचे सेट तोडून टाकला आहे.त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर पालिकेने लागलीच अंधेरीच्या ज्या हॉटेलात हा शो शूट झाला तेथे जाऊन बुलडोजर चालविला आहे. एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केलेले गाणे कुणाल याने शोच्या शेवटी गायले होते. या शो संदर्भात ट्रेलर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शेअर केल्यानंतर तर शिवसैनिकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि रात्री उशीरा शिवसैनिक हॉटेलात पोहचले आणि तोडफोड केली आहे.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने याआधी देखील महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या बाजूने शो केले होते. कुणाल कामरा यांच्या शोवर त्याने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना देखील बोलावले होते. त्यामुळे पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती अंबानी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर या शोमध्ये विडंबनात्मक टीका असल्याने शिवसेना आणि महायुतीचे सर्वच नेते संतप्त झाले आहेत. कुणाल कामरा याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कुणाल कामरा या घटनेनंतर पाँडेचेरी येथे गेला असल्याचे म्हटले जात आहे. या कॉमेडी शो दरम्यान एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख करीत पॅरीडी साँग गायले आहेत त्यात त्या गाण्याला त्याने शाहरुख खानच्या डीडीएलजेच्या ‘भोली सी सुरत’ या गाण्याची चाल लावली आहे.

राजकारणावर भाष्य केले

कॉमेडी शोमध्ये कुणाल कामरा याने महाराष्ट्राच्या राजकारणासह देशातील राजकारणावर भाष्य केले. या शोच्या अखेरीस त्याने काही पॅरीडी साँग सादर केली होती. त्यात कुछ कुछ होता है या चित्रपट गीताच्या चालीवर त्याने गद्दार एकनाथ शिंदे असे गाणे सादर केले होते. त्याआधी कुणाल याने एकनाथ शिंदे यांनी शिवसेना कशी फोडली आणि पक्ष कसा गिळंकृत केला आणि न्यायालयाने देखील कशी साथ दिली याचा उल्लेख केला. आधी भाजपातून शिवसेना बाहेर आली. नंतर शिवसेनेतून शिवसेना बाहेर आली.नंतर एनसीपीतून एनसीपी बाहेर आली. एक व्होटर आणि ९ बटण देण्यात आले. त्यामुळे मतदार कसे कन्फ्युज झाल्याचे कुणाल यावेळी म्हणाला.

कामराच्या शोमध्ये काय झाले

कामराच्या शो दरम्यान एक गाणे गायले गेले. त्या गाण्याचे बोल असे होते की, ‘ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय.., एक झलक दिखलाए, कभी गुवाहाटी में छुप जाए. मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर ओ आए’ यावरुन शिवसेना आक्रमक झाली आणि कामरा याच्या शो नंतर एकना शिंदे यांचे शिवसैनिक मुलजी काका पटेल यांच्या नेतृत्वाखाली अंधेरी एमआयडीसीतील युनी कॉन्टीनेन्ट हॉटेलात रात्री साडे अकरा वाजता पोहचले आणि स्टूडियोची तोडफोड केली. आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अभिनेत्री कंगणा रणौतने टीका केली होती. त्यावेळी पालिकेने तिच्या घराचे काम तोडले होते. आता तशाच प्रकारे अंधेरीतील या हॉटेलचे बांधकाम पालिकेने तोडले आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;