महात्मा मोठा की भारतरत्न ? छगन भुजबळ यांच्या सवालाने नवा वाद ?

महात्मा मोठा की भारतरत्न ? छगन भुजबळ यांच्या सवालाने नवा वाद ?

जळगावात मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा मेळावा झाला. महात्मा फुले यांना अलिकडे काही मंडळी भारत रत्न पुरस्कार द्यावा म्हणून मागणी करीत आहेत याचा उल्लेख करीत मंत्री छगन भजबळ म्हणाले की मग महात्मा गांधी यांना भारतरत्न द्या ना ? का देत नाहीत?. ज्योतिबा फुले महात्मा आहेत. महात्मा मोठा कि भारतरत्न ? महात्मा किती आहेत ? भारतरत्न किती आहेत ? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला, त्यानंतर ते म्हणाले की महात्मा आणि क्रांतीज्योती हेच शब्द आम्हाला प्रिय आहेत.

त्यानंतर छगन भुजबळ यांनी घटनाकार डॉ.बाबासाहेब यांनी घटना लिहीली आहे. जगातील अनेक देश भारतीय घटनेचा अभ्यास करुन  संविधान तयार करतात अशी पुस्ती जोडली. छगन भुजबळ पुढे म्हणाले की अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ 750 कोटी दिले… द्या त्यांना आमचा विरोध नाही. परंतू ओबीसी महामंडळा पाच कोटी कसे ? मराठा समाजासाठी काम करणाऱ्या सारथीला 515 कोटी दिले. मग महाज्योतीला 325 कोटी का? मी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो ते बोलले की जेवढे पैसे इकडे दिले तेवढेच पैसे तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन मला मिळाल्याचे भुजबळ म्हणाले. हे होत असते परंतू जागरुक रहायला पाहीजे. पण लोक घाबरतात. निवडणूक लढवायची असते. त्या मोठ्या समाजाला कसे दुखवायचे ?

जालन्याचे सो कोल्ड लीडर

जालन्याचे सो कोल्ड लीडर येवल्यात फक्त येऊन बसले आणि फक्त छगन भुजबळ यांना पाडा असा प्रचार करीत राहीले. येवल्यात येऊन बसले पण येवल्याचे लोक हुशार त्यामुळे २५ हजार ते तीस हजार मताधिक्य कमी झाले. ओबीसी समाजावर एवढाही अन्याय करु नका की हा समाज एके दिवशी एवढा जागरुक होईल की पक्षाला विसरुन जाईल असा इशारा भुजबळ यांनी यावेळी दिला. मध्यंतरी एक आदेश आला की ग्रामपंचायतीच्या जागा कमी होत आहेत. भाटीया कमिशनने हा अहवाल  एसी रुममध्ये बसुन तयार केला. भाटीया कमिशनची ती चूक होत होती.

भाटीया कमिशनचा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही

छगन भुजबळ पुढे म्हणाले की सिन्नरच्या एका गावात शून्य ओबीसी दाखवले होते. आम्ही आमचे लोक पाठवले तर त्या ग्रामपंचायचीचा सरपंच ओबीसी होता. भाटीया कमिशनचा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही. या अहवालानंतर ९२ ठिकाणी निवडूक झाल्या आणि  शुन्य ओबीसी होते. मग मध्य प्रदेशातील इतर राज्यातील निवडणूका आल्या आता काय करणार ? मग शिवराज सिंह चौहान केंद्रात गेले त्यांनी काहीतरी करुन हा निर्णय  थांबवल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;