मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात मोठं ट्विस्ट, वडिलांची हायकोर्टात धाव

मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात मोठं ट्विस्ट, वडिलांची हायकोर्टात धाव

मोठी बातमी समोर येत आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. सामूहिक बलात्कार करुन दिशाची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. किशोरी पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्या यांच्यसह मुंबई पोलिसांवर देखील या याचिकेतून आरोप करण्यात आले आहेत.

यापूर्वी जेव्हा दिशा सालियानच्या वडिलांशी संवाद साधण्यात आला होता, तेव्हा अशी कुठलीही शक्यता त्यांनी फेटाळून लावली होती. आता मात्र त्यांनी या प्रकरणात याचिका दाखल करत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. किशोरी पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्या यांच्यसह मुंबई पोलिसांवर देखील या याचिकेतून आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल व्हावा, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, आणि हायकोर्टाच्या देखरेखीखाली तपास व्हावा, अशा पद्धतीची मागणी या प्रकरणात करण्यात आली आहे.

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नव्यानं चौकशीसाठी वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे, यावर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. दिशाचा सामूहिक बालात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे, या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करत त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्याची मागणी देखील या याचिकेतून करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप  दिशाच्या वडिलांनी केला आहे.  नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा आरोपही  दिशाच्या वडिलांनी याचिकेतून केला आहे. मंत्री नितेश राणे तसेच पत्रकार अर्णब गोस्वामींनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचा दावा देखील याचिकेमध्ये करण्यात आला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;