संतोष देशमुख हत्येतील सर्व आरोपींनी फाशी द्या, तोपर्यंत एकही सण साजरा न करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार,पाहा काय घडले ?

संतोष देशमुख हत्येतील सर्व आरोपींनी फाशी द्या, तोपर्यंत एकही सण साजरा न करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार,पाहा काय घडले ?

 

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी दहा डिसेंबर रोजी अपहरणानंतर हत्या करण्यात आली होती. या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या हत्याकांडानंतर महाराष्ट्राची वाट आता बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने होऊ लागली आहे. आता मस्साजोग ग्रामस्थांनी यंदाचा होळी सण साजरा केला नाही. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत कोणताही सण साजरा करणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी १० डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. या हत्याकांडाची सुई मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते वाल्मीक कराड यांच्या दिशेने वळली होती. त्यानंतर या प्रकरणात ९ ते १० आरोपींना अटक करण्यात आली होती. वाल्मीक कराड या प्रकरणात पुणे सीआयडीच्या कार्यालयात हजर झाला. त्यानंतर या सर्व आरोपींना मोक्का लावण्यात आला. या प्रकरणात सुरुवातीपासूनच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखर अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर संतोष देशमुख यांच्या हत्येचे आठ व्हिडीओ आणि १५ फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या फोटोत ही हत्या किची निर्घृण आणि क्रुरतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

संतापाचा उद्रेक उडाला

संतोष देशमुख यांच्या मृतदेहांची अक्षरश: विटंबना करतानाचे फोटो काढण्यात आले होते. हा फोटो व्हायलर करण्यात आले. त्यामुळे संतापाचा उद्रेक उडाला. या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला उभारला गेला आहे. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात मस्साजोगमध्ये यंदा होळी आणि धुळवड साजरी न करण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला आहे. इतकेच या पुढे जोपपर्यंत सर्व आरोपींना फाशी होत नाही तर मस्साजोगमध्ये कोणताच सण साजरा न करण्याची शपथ ग्रामस्थांनी घेतली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;