आधी सूचक विधान अन् आता…; जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय?

आधी सूचक विधान अन् आता…; जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाथ्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र जयंत पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं.  माझं काही खरं नाही, माझी ग्यारंटी घेऊ नका असं त्यांनी म्हटलं होतं, यावरून पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली, आता त्यावर देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

मी नाराज वैगरे काही नाही, तशीही मला बाहेर बोलायची चोरी झाली आहे. मी भाषण केलं त्याचा रेफरन्स बघा. शक्तीपीठ रस्त्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला, त्यांच्यासमोर भाषण करताना मी ते म्हंटलो होतो. राजू शेट्टी यांनी झेंडा हातात घेतलाय म्हंटल्यावर काही काळजीच कारण नाही. हा विनोदाचा भाग होता. राजू शेट्टी यांचा आमच्यावर विश्वास नाही, त्यांना आम्ही उभं राहायला सांगत होतो. ‘त्यामुळे माझे तुम्ही गृहीत धरू नका, खरं धरू नका तुम्ही तुमचं आंदोलन सुरू ठेवा. तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे,’ अशी त्यामागची भावना होती, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आम्ही एका कुटुंबातील सर्वजण आहोत, आम्ही कुणाला इशारा देत बसत नाही. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे, जो काय निर्णय घ्यायचा आहे तो पक्षाच्या हिताचाच घेऊ, त्यामुळे मी इकडे जाणार तिकडे जाणार हा विषय होऊ शकत नाही, आणि होणारही नाही, असंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी मल्हार सर्टिफिकेटवरून देखील जोरदार हल्लाबोल केला. हे फार शॉकिंग आहे, असा प्रचार करणं हे चुकीचं आहे. माणूस कुठल्या जातीत जन्माला यायचं हे ठरवून येत नाही. नितेश राणे यांनी ठरवलेलं नाही की कोणी कुणाच्या पोटी जन्माला यायचं. त्यामुळे ते जे बोलत आहेत ते माणुसकीच्या बाहेर जाऊन बोलत आहेत. त्यांनी धर्माच्या काही गोष्टी असतील तर त्या मांडल्या पाहिजेत पण दुसऱ्याच्या धर्माची हेटाळणी करणं चुकीचं आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;