कोंडी केली, खटले दाखल केले, पक्ष सोडण्यासाठी दबाव… धंगेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून राऊतांचा आरोप

कोंडी केली, खटले दाखल केले, पक्ष सोडण्यासाठी दबाव… धंगेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून राऊतांचा आरोप

रविंद्र धंगेकर हे सुरूवातील शिवसेनेमध्ये होते, नंतर ते मनसेत गेले, पुढे काँग्रेसमध्ये गेले आणि काल त्यांनी एकनाथ शिंदे गटात ( शिवसेना) प्रवेश केला. ते चांगले कार्यकर्ते आहेत. पण त्यांनी सांगितलं की विकासकामं होत नाहीत, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहेत, म्हणून मी शिंदे गटात चाललो आहे. पण मला एक कळत नाही की शिंदे गटात गेल्यामुळे महाराष्ट्रातली किंवा त्यांच्या कसबा मतदार संघातील कोणती विकासकामं मार्गी लागणार आहेत ? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

अजित पवारांच्या गटात, शिंदे गटात हे जे प्रवेश सुरू आहेत ते सरळसरळ भीतीपोटी प्रवेश झाले आहेत. स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांची लोकं यांनी भीतीपोटीच पक्षांतर केलं. अजित पवारांनीही किंवा आमच्या पक्षातून जे लोकं भाजपमध्ये गेले, त्यांनीही भीतीपोटीच पक्ष सोडला. एखाद्याने प्रवेश करावा म्हणून त्यांची आर्थिक कोंडी केली जाते, आणि त्यांच्या विरोधात काही प्रकरणं असली तर दबाव आणला जातो असा आरोप संजय राऊत यांनी केला. रविंद्र वायकरांचंसुद्धा असंच एक प्रकरण होतं. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांनी पक्षांतर केल्यावर ताबडतोब 24 तासांच त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले, आता रविंद्र धंगेकरांसारखा कार्यकर्ता फोडण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लावण्यात आली, खोटे गुन्हे टाकण्यात आले, असेही ते म्हणाले.

रविंद्र धंगेकर खरोखर का गेले? हे त्यांनी त्यांच्या दैवताला स्मरून खरोखर सांगावं, असं आव्हान राऊतांनी दिलं. धंगेकरांनी पक्ष सोडावा असं वातावरण तयार करण्यात आलं, त्यांची कोंडी करण्यात आली, त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी भीती दाखवण्यात आली. त्याच भीतीपोटी, विकासकामं रखडली या सबबीखाली रविंद्र धंगेकर हे शिंदे गटात गेले, असा आरोपही राऊतांनी केला.

पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. सत्तेत आल्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय देता येत नसल्याची भूमिका धंगेकर यांनी मांडली . तर रवींद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी रवींद्र धंगेकर यांचे शिवसेनेत स्वागत केले.आता तुम्ही शिवसेनेत आला आहात. आता लोकांना कळेल who is dhangekar? असेही शिंदे म्हणाले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;