सरकारी रुग्णवाहिकेसाठी फोन केला, सहा तासांत रुग्णवाहिका आली नाही…रुग्णाने सोडले प्राण

सरकारी रुग्णवाहिकेसाठी फोन केला, सहा तासांत रुग्णवाहिका आली नाही…रुग्णाने सोडले प्राण

Mumbai News: राज्यात सरकारी रुग्णवाहिकेसाठी 108 क्रमांकावर फोन केला जातो. त्यानंतर काही वेळेतच रुग्णवाहिका येत असल्याचा दावा केला जातो. परंतु उल्हासनगरमध्ये वेगळाच प्रकार घडला. अत्यवस्थ असलेल्या रुग्णास नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिकेला फोन केला. परंतु एक तास झाला, दोन तास झाले तरी रुग्णवाहिका आली नाही. फोन केल्यावर सहा तास झाल्यावरही रुग्णवाहिका आली नाही. अखेर चिंताजनक प्रकृती असलेल्या त्या रुग्णाने प्राण सोडला. या प्रकरणात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन करण्यात आले.

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन करण्यात आले आहे. मध्यवर्ती रुग्णालयात प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णावर योग्य उपचार झाले नाहीत आणि त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी तब्बल ६ तास सरकारी रुग्णवाहिका आली नाही, याबाबत ठापका त्यांच्यावर ठेवण्यात आला. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशात याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर डॉक्टर बनसोडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन करण्यात आले.

असा घडली होती घटना…

उल्हासनगरच्या कॅम्प १ मधील हर्षवर्धन नगरमध्ये राहणारे राहुल इंधाते यांना २२ जानेवारी रोजी मध्यवर्ती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत खालावत असल्याने मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना खासगी रुग्णालयात शिफ्ट करण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला होता. त्यासाठी त्यांनी दुपारी २ वाजता नातेवाईकांनी सरकारी रुग्णवाहिकेसाठी फोन केला. पण रात्रीचे ८ वाजले तरी सरकारी रुग्णवाहिका आली नाही. अखेर रात्री ८ वाजता राहुल इंधाते यांनी अखेरचा श्वास घेतला. राहुल यांच्या कुटुंबियांनी खासगी रुग्णवाहिकेने नेतो, असे म्हटल्यावर मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला परवानगी नाकारत डिस्चार्ज न दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता.

याप्रकरणी कर्तव्यावर असलेल्या ३ डॉक्टरांना मध्यवर्ती रुग्णालयाचे प्रमुख असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी नोटीस बजावली होती. याबाबत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. त्याची दखल घेत आरोग्य सेवा आयुक्तालयाचे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;