थकीत देण्यांच्या बोजाने एसटी वाकली, अर्थसंकल्पात आर्थिक पॅकेज जाहीर करा, कामगार युनियनची मागणी

थकीत देण्यांच्या बोजाने एसटी वाकली, अर्थसंकल्पात आर्थिक पॅकेज जाहीर करा, कामगार युनियनची मागणी

राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन आज सोमवारपासून सुरु झाले आहे. येत्या १० मार्च रोजी राज्याचा साल २०२५-२६ चा अर्थसंकल्पा मांडला जाणार आहे. एकीकडे स्वारगेट प्रकरणानंतर एसटी महामंडळ चर्चेत असताना आता एसटीची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याने एसटी कर्मचाऱ्यांची सर्व देणी थकली आहेत.त्यामुळे एसटी महामंडळाची वर्षानुवर्षांची देणी तातडी देण्यात यावी आणि एसटीला आर्थिक उभारी देण्यासाठी एसटीला आर्थिक पॅकेज मंजूर करावे अशी मागणी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटी महामंडळाचा संचित तोटा वाढतच चालला आहे.एसटी कामगारांची देणी रखडली आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आर्थिक संकटात सापडलेले आहे. एसटी कर्मचाऱ्यांची थकीत देणी तसेच महामंडळाची एकूण थकीत देणी चुकती करण्यासाठी या अर्थसंकल्पात एसटीला आर्थिक मदत पॅकेज मंजूर करावे असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची आणि महामंडळाची सरकारकडून येणारी प्रतीपूर्तीची अनेक देणी निधी अभावी थकली आहेत. ही देणी चुकती करण्यासाठी साधारण ५००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची आवश्यकता आहे. या थकीत देण्यामुळे महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे. त्याचा एसटीच्या उत्पन्न वाढीवर सुद्धा परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची देणी प्रलंबित असल्याने कामगारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. या संकटातून एसटी महामंडळाची सुटका करायची असेल तर सरकारकडून अर्थ सहाय्य देऊन एसटीला आर्थिक मदत पॅकेज जाहीर झाले पाहिजे असे बरगे यांनी म्हटले आहे.

एसटी महामंडळाची एकूण थकीत देणी!

सरकार कडून न प्राप्त झालेली गेल्यावर्षीची तुटीची रक्कम १००० कोटी रुपये

थकीत महागाई भत्ता रक्कम १२० कोटी रुपये

पी.एफ. थकीत रक्कम ११०० कोटी रुपये

उपदान म्हणजेच ग्राजुटी थकीत रक्कम ११५० कोटी रुपये

एसटी बँक थकीत रक्कम १५० कोटी रुपये

एल आय सी थकीत रक्कम १० कोटी रुपये

रजा रोखिकरण थकीत रक्कम ६० कोटी रुपये

वैद्यकीय प्रतिपूर्ती थकीत रक्कम १० कोटी रुपये

डिझेल थकीत रक्कम १०० कोटी रुपये

भांडार देणी थकीत रक्कम ८० कोटी रुपये

पुरवठादार कंपनी थकीत देणी रक्कम ५० कोटी रुपये

अपघात सहाय्यता निधी थकीत रक्कम ३ कोटी रुपये

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;