मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकात सरकते जिने, शेलू स्थानकात लिफ्ट, आणखी काय सुविधा ?

मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकात सरकते जिने, शेलू स्थानकात लिफ्ट, आणखी काय सुविधा ?

पूर्वी केवळ विमानतळ आणि मॉलमध्ये दिसणारे सरकते जिने आता सगळीकडे दिसू लागले आहे. मध्य रेल्वेवर तर सरकते जिने आणि लिफ्टची अनेक वर्षांपासून सुरु आहेत. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयी आणि सुविधेसाठी अनेक उपक्रम सुरु केले आहेत. आता मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावर कर्जत रेल्वे स्थानकावर कल्याण दिशेकडील फुटओव्हर ब्रिजवर दोन सकरते जिने बसवले आहेत. तर शेलु स्थानकाच्या कर्जत दिशेला ज्येष्ठ नागरिकांसाठी एक लिफ्ट देखील उभारण्यात आली आहे. सरकते जिने आणि लिफ्टचा वापर ज्येष्ठ नागरिक आणि महिला तसेच लहान मुलांना करता येणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी आणखीन काय सुविधा ?

मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी सँडहर्स्ट रेल्वे स्थानकावर चार नवीन GPS clocks बसविण्यात आली आहेत.जुन्या उपनगरीय इंडिकेटर्सना बदलण्यात आले आहे. आणि नवीन अधिक चांगली इंडिकेटर्स बसविण्यात आली आहेत. घणसोली, रबाळे आणि ऐरोली स्थानकात अधिक चांगली दिसणारी इंडिकेटर्स बसविण्यात आली आहेत. उल्हासनगर, वांगणी आणि नेरुळ स्थानकांत ऑल इन वन व्हिडीओ डिस्प्ले इंडिकेटर्स बसविण्यात आली आहेत.

दिव्यांगासाठी सुविधा

मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनमधील ८६ स्थानकांवर ५७५ एटीव्हीएम (Automatic Ticket Vending Machines) बसविण्यात आली आहेत. दिव्यांग प्रवाशांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर एकूण १७० बझर बसविण्यात आले आहेत. मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कार्यक्षम, परवडणारी आणि ग्राहक-केंद्रित वाहतूक उपाय प्रदान करण्यात नेहमीच आघाडीवर राहिली आहे आणि ग्राहक आणि प्रवाशांचा प्रवास आनंददायी बनवण्यासाठी अनेक उपक्रम आणि उपाययोजना मध्य रेल्वेने राबविल्या आहेत.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;