मोठी बातमी! धनंजय मुंडे अडचणीत, करुणा शर्मांनी टेन्शन वाढवलं, 15 मार्चला काय होणार?

मोठी बातमी! धनंजय मुंडे अडचणीत, करुणा शर्मांनी टेन्शन वाढवलं, 15 मार्चला काय होणार?

धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला होता. या प्रकरणात त्यांनी ऑनलाई पद्धतीनं तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल न्यायालयाकडून घेण्यात आली आहे, न्यायालयानं धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी येत्या 15 मार्च रोजी होणार आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्या बाबतची तक्रार करुणा शर्मा यांनी ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, याबाबत आता 15 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जा सोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. मात्र करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. त्यांनी ही माहिती दडवल्याबाबत शर्मा यांनी तक्रार केली होती. आता  याप्रकरणात पुढील सुनावणी  15 मार्च रोजी होणार आहे.

दरम्यान दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे. विद्रोही साहित्य संमेलनामध्ये एकूण 29 ठराव घेण्यात आले, त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, असा ठराव देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंडेंच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे, धनंजय मुंडे यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे, त्यातच आता विद्रोही साहित्य संमेलनामध्ये देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;