‘एकनाथ शिंदे डॉक्टर ते ऑपरेशन कसं करतात हे राऊतांना माहितीये’ शिवसेनेच्या नेत्याचा खोचक टोला

‘एकनाथ शिंदे डॉक्टर ते ऑपरेशन कसं करतात हे राऊतांना माहितीये’ शिवसेनेच्या नेत्याचा खोचक टोला

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे अनेकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असतात. या टीकेला आता शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी संजय राऊत यांना चांगलंच सुनावलं आहे.  संजय राऊत यांना सकाळी उठून आरोप करण्याची सवय लागलेली आहे, मुळात संजय राऊत यांच्या आरोपांना कोणीही गंभीर्याने घेत नाही आणि एकनाथ शिंदे यांना हलक्यात घेण्याची काही गरज नाहीये, ते डॉक्टर आहेत कशा पद्धतीने ते ऑपरेशन करतात हे संजय राऊत यांनी चांगल्या पद्धतीने पाहिलेलं आहे, असा हल्लाबोल मनिषा कायंदे  यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मुळात संजय राऊत हे शिवसेनेच्या आमदारांच्या मतावर खासदार झालेले आहेत, त्यांची इतकी हिंमत असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मग वाटेल ते बोलत बसावं. आम्हाला तर एवढं पण सांगण्यात आलेलं आहे की ऑपरेशन टायगरमुळे संजय राऊत हे व्यथित झालेले आहेत, ते फस्ट्रेट झालेत त्यांना आता ना उद्धव ठाकरे जवळ उभा करत ना शरद पवार, असा घणाघात यावेळी मनिषा कायंदे यांनी केला आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाणार आहेत, यावर देखील कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हे लवकरच कुंभमेळ्याला जाणार आहेत, या दौऱ्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार असतील, असं कायंदे यांनी म्हटलं आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, यावर देखील कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करायची की नाही हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, ही मुळात त्यांच्या पक्षाची जबाबदारी आहे, त्यामुळे ते योग्य ते निर्णय घेतील, असंही यावेळी मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;