कल्याण येथे भाजपाच्या कार्यालयाची तोडफोड, सीसीटीव्ही देखील तोडून टाकले

कल्याण येथे भाजपाच्या कार्यालयाची तोडफोड, सीसीटीव्ही देखील तोडून टाकले

भाजपाच्या कार्यालयाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. भाजपाचे सरकार असताना कार्यालयाची अशा प्रकारे थोडफोड झाल्याने सामान्य कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. या प्रकरणात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.भाजपाच्या सत्ताकाळातच पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कल्याण पश्चिम येथील वसंत व्हॅली परिसरातील भाजपाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही तोडफोड अज्ञात व्यक्तींकडून झाल्याचे उघडकीस आले आहे.ही तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. भाजप वाहतूक आघाडी कल्याण अध्यक्ष कृष्णा कारभारी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. विकासकांकडून जागा बळकवण्यासाठी 30 ते 40 जणांच्या टोळीने येऊन तोडफोड केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी शैलेश जैन आणि रितेश किमतानी यांच्यासह किमान २५ जणांविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

“माझा जीव आणि जागा दोन्ही धोक्यात”

आपला जीव आणि जागा ही धोक्यात असल्याचे भाजप वाहतूक आघाडी कल्याण अध्यक्ष कृष्णा कारभारी यांनी म्हटले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी धावा केला आहे. ही तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.यात सीसीटीव्ही कॅमेरे फोडून कार्यालयात जबरदस्तीने घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणात खडकपाडा पोलिस अधिक तपास करीत आहेत. यापूर्वी देखील यांच्या जागेत घुसखोरीचा प्रयत्न झाला होता असे म्हटले जात आहे. या प्रकरणात तुम्ही अनधिकृतपणे कशी काय घुसखोरी करु शकता, तुमच्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे का असा सवाल भाजप वाहतूक आघाडी कल्याण अध्यक्ष कृष्णा कारभारी यांनी केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;