खळबळजनक! धावत्या लोकलमध्ये तरुणाकडून तीन जणांवर चाकू हल्ला

खळबळजनक! धावत्या लोकलमध्ये तरुणाकडून तीन जणांवर चाकू हल्ला

मोठी बातमी समोर येत आहे, धावत्या लोकलमध्ये तरुणाकडून तीन जणांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. कल्याणहून दादरला जाणाऱ्या लोकलमध्ये ही घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार धक्का लागण्याच्या कारणातून वाद झाला, या वादानंतर या तरुणानं धावत्या लोकलमध्ये तीन जणांवर चाकू हल्ला केला आहे.  शेख जिया हुसेन असं या हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही ट्रेन कल्याणहून दादरला निघालेली होती.  कामावर जाण्याची घाई असल्यानं या ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. जो हल्लेखोर तरुण आहे शेख जिया हुसेन याला मुब्राला उतरायचं होतं. मात्र त्याला उतरायला जागा मिळत नव्हती. त्याला जेव्हा माहिती पडलं की ही फास्ट ट्रेन मुब्रा येथे थांबणार नाही तेव्हा तो लोकांना धक्का मारून, दरवाजाच्या दिशेन जाण्याचा प्रयत्न करत होता.  यावरून वाद सुरू झाला, काही प्रवाशांनी त्याच्यासोबत वाद घातला.

त्याला दरवाजाकडे जायचं होतं, मात्र त्याला जागा मिळत नव्हती, त्यानंतर त्याने त्याच्यासमोर असलेल्या प्रवाशांना धक्का मारून दरवाजाकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी लोकलमधील काही प्रवाशांसोबत त्याचा वाद झाला. त्याला राग आल्यानं त्याने आपल्या खिशातील चाकू काढून त्याने तीन जणांवर चाकूचा हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये प्रवाशी जखमी झाले आहेत.

तरुणाला अटक 

या धक्कादायक घटनेनंतर डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी हल्लेखोर तरुण शेख जिया हुसेन वय 19 वर्ष या तरुणाला अटक केली आहे.  घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकलमधल्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी देखील काही अशा घटना घडल्या आहेत. अनेकदा नशेत असलेल्या व्यक्तिंकडून देखील प्रवाशांना त्रास दिला जातो. त्यानंतर आता प्रवाशांवर चाकू हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;