“मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा”, आरपीएफ जवानाची मनसे नेत्यासोबत मुजोरी

“मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा”, आरपीएफ जवानाची मनसे नेत्यासोबत मुजोरी

मोठी बातमी समोर येत आहे, उल्हासनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाची मुजोरी पाहायला मिळाली आहे. आरपीएफ जवानाने मराठी बोलण्यास नकार दिला, तसेच त्यानं या प्रकरणात मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम  यांच्याशी हुज्जत घातली. एवढंच नाही तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? असा संतापजनक सवाल देखील यावेळी करण्यात आला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  “मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा”, अशी मुजोरीची भाषा उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाने वापरली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्याशी बोलताना त्याने ही भाषा वापरली.

उल्हासनगर रेल्वे स्थानकात बुकिंग वरून सुरू असलेल्या गोंधळाची माहिती घेण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम हे तिथे गेले असता एका आरपीएफ जवानाने हिंदीत बोलण्यास सुरुवात केली. त्यावरून ‘मराठीत बोला’ असं सचिन कदम यांनी म्हटलं असता, मला मराठी येत नाही, असं त्याने म्हटलं.

 

त्यावर याबाबत मी डीआरएमकडे तक्रार करतो, असं सचिन कदम यांनी म्हणताच – जा माझी तक्रार करा, अशी मुजोरीची भाषा या आरपीएफ जवानाने वापरली. तर त्यानंतर तिथे मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या एका आरपीएफच्या मराठी अधिकाऱ्यानेही ‘त्याला मराठी येत नाही, पण तुम्हाला सुद्धा हिंदी येत नाही का? तुम्ही हिंदीत बोला’, असा सल्ला मनसे पदाधिकाऱ्यांना दिला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा वापरण्याबाबतचा जीआर काढला असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, असं मनसे नेते सचिन कदम यांनी त्यांना सांगितलं. त्यावर ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला?’ असा संतापजनक सवाल या मराठी आरपीएफ अधिकाऱ्याने केला. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून याप्रकरणी आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन महाराष्ट्रात काम करणाऱ्या परप्रांतीय आरपीएफ जवानांना मराठी भाषेचे धडे द्यावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;