मोठी बातमी! खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यात अपघात, आमदार गंभीर जखमी

मोठी बातमी! खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यात अपघात, आमदार गंभीर जखमी

मोठी बातमी समोर येत आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाहाणी दौऱ्यात अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे जखमी झाले आहेत. अंबरनाथ क्रीडा संकुल परिसरामध्ये ही दुर्घटना घडली आहे. या परिसरात असलेलं एक गटार ओलांडताना तोल जाऊन आमदार राजेश मोरे हे गटारीमध्ये पडले. या अपघातामध्ये त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज श्रीकांत शिंदे यांचा कल्याणमध्ये चार ठिकाणी पाहणी दौरा होता. त्यापैकी एक अंबरनाथमधील अंबरनाथ मंदिराला ते भेट देणार होते, त्यानंतर डोंबिवलीमधील शिवमंदिर आणि आणखी दोन ठिकाणी त्यांचा पहाणी दौरा होता. मात्र श्रीकांत शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यापूर्वीच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे तिथे पोहोचले. यावेळी क्रीडा संकुलाकडे जात असताना एक नाला ओलांडताना त्यांचा तोल गेला आणि ते गटारीत पडले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हाताला गंभीर दुखापत 

आज श्रीकांत शिंदे यांचा कल्याणमध्ये चार ठिकाणी पाहणी दौरा होता. त्यापैकी एक अंबरनाथमधील अंबरनाथ मंदिराला ते भेट देणार होते, त्यानंतर डोंबिवलीमधील शिवमंदिर आणि आणखी दोन ठिकाणी त्यांचा पहाणी दौरा होता. मात्र श्रीकांत शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यापूर्वीच आमदार राजेश मोरे हे तिथे पोहोचले. यावेळी क्रीडा संकुलाकडे जात असताना एक नाला ओलांडताना त्यांचा तोल गेला आणि ते गटारीत पडले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;