नव्यांना राम राम आणि निष्ठावंतांना थांब थांब… कान टोचणारं पत्र, ठाकरे गटाच्या आणखी एका नेत्याचा राजीनामा; गळती सुरूच

नव्यांना राम राम आणि निष्ठावंतांना थांब थांब… कान टोचणारं पत्र, ठाकरे गटाच्या आणखी एका नेत्याचा राजीनामा; गळती सुरूच

उद्धव सेनेला चोहोबाजूने खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे. शिंदे गटाकडून तोडक काम सुरू आहे. कार्यकर्त्यापासून ते पदाधिकारी, नेत्यापर्यंत प्रत्येक जणाला गळ लावून शिंदे सेनेत आणण्याचे जोरकस प्रयत्न सुरू आहे. राजन साळवी गेल्यानंतर अजून बडेच बडे चेहरे शिंदे गोटात येतील, असा दावा करण्यात येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव सेना खिळखिळी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच पुण्यात आणि सिल्लोडमध्ये उद्धव गटाला धक्का बसला आहे.

उद्धव ठाकरेंना पुण्यात मोठा धक्का

पुण्यात शहर उप प्रमुख राजेश पळसकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत 40 ते 50 कार्यकर्त्यांसोबत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. पुण्यात प्रस्तावित असणाऱ्या प्रवेशांसोबत हा प्रवेश सोहळा होईल. 22 वर्ष शिवसेनेत काम केल्यानंतर पळसकर यांनी अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांनी लिहिलेले पत्र सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

‘नव्यांना राम राम आणि निष्ठावंतांना थांब थांब’

एक गणेश मंडळाचा कार्यकर्त्यापासून आपला शिवसेना प्रवेश झाल्याचे पळसकर म्हणाले. आजतागायत गेली २२ बर्षे पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या कोणत्याही अपेक्षा व लालसा न करता प्रामाणिकपणे पार पाडत आालो. साम दाम दंड भेद या नीतीने संघटना वाढीसाठी काम करत राहिलो.

मागून आालेले अनेक जन पक्षाच्या माध्यमातून विविध संविधानिक पदावर गेले, तरीही कोणतीही तक्रार न करता पक्षासाठी झटत राहिलो. हे करताना पक्षाच्या आांदोलनाचे अनेक गंभीर गुन्हे देखील माझ्यावर दाखल होऊन अनेकदा तुरुंगावारी देखील झाली, असे पळसकर यांनी स्पष्ट केले.

आजपर्यंत पक्षावर आलेल्या संकटकाळात देखील निष्ठावंत म्हणून पक्षासोबत राहिलो. परंतू अलीकडच्या काळात राजकीय महत्वकांक्षा मनात ठेऊन काही जन पक्षाची पदे, उमेदवाऱ्या मिळून कार्यभाग साधून निघून जात आहेत अशा पक्षाशी निष्ठा नसलेल्यांना मोठ्या पदावर घेण्याचा नवीन पायंडा काही नेत्यांकडून पाडला जात आहे, सध्या संघटनेत “नव्यांना राम राम आणि निष्ठावंतांना थांब थांब” हि संकल्पना काही नेते राबवत आहे. ते मनाला पटले नसल्याने राजीनामा देत असल्याचे पत्र पळसकर यांनी ठाकरे यांना लिहिले आहे.

सुरेश बनकर यांचा जय महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सिल्लोडचे उमेदवार सुरेश बनकर भाजपमध्ये दाखल झाले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते भाजपवासी झाले. बनकर यांनी ठाकरे गटाकडून अब्दुल सत्तार यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी सत्तारांना कडवी झुंज दिली होती. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सुरेश बनकर यांनी भाजपाची वाट धरली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;