‘मला फडणवीसांनी शस्त्र हातात घेण्याची परवानगी द्यावी, मी गेल्या जन्मी…, बिचकुले राहुल सोलापूरकरवर प्रचंड संतापले

‘मला फडणवीसांनी शस्त्र हातात घेण्याची परवानगी द्यावी, मी गेल्या जन्मी…, बिचकुले राहुल सोलापूरकरवर प्रचंड संतापले

अभिनेता राहुल सोलापूरकरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर राज्यभरातून त्याच्यावर टीकेची झोड उठली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकरला इशारा दिला होता. जितेंद्र आव्हाड यांच्या इशाऱ्यानंतर आता अभिजित बिचुकले यांनी देखील राहुल सोलापूरकर याच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘राहुल तुझ्यातील टकलू हैवान जागा झालेला दिसतोय, त्या टकलू हैवानाचा बंदोबस्त करायला अभिजीत बिचुकले जेम्स बॉण्ड झाला तर तुला महागात पडेल.’ असं अभिजित बिचकुले यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले बिचकुले?  

‘राहुल तुझ्यातील टकलू हैवान जागा झालेला दिसतोय, त्या टकलू हैवानाचा बंदोबस्त करायला अभिजीत बिचुकले जेम्स बॉण्ड झाला तर तुला महागात पडेल. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल या देशात जर कोणी बोलत असेल तर मी देवा भाऊंना सांगू इच्छितो फाशी द्यायला जसा जल्लाद असतो तसा मला परवाना द्या. महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य केलं, तर मी त्यांचा शिरच्छेद करील, मला परवाना द्या.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मंत्री शिवेंद्र राजे यांच्यावर देखील टीका केली आहे. राहुल सोलापूरकरला शिवेंद्रराजे आवजाव बोलतात त्यांना मंत्रिपद जाण्याची भीती आहे का? असा सवाल यावेळी बिचकुले यांनी केला आहे. जयंतराव पाटील मागे बोलले होते मंत्रिपदाचा तुकडा मिळाला की शिवेंद्र राजे तिकडे जातात. शिवेंद्रराजे सरकारमध्ये शिपाई आहेत का? की मंत्री आहेत. शिवेंद्रराजेंनी देवा भाऊंच्या तोंडावर राजीनामा फेकावा. देवेंद्र फडणवीस परमिशन देणार असतील तर मी शस्त्र हातात घेईल, मी गेल्या जन्मी राजा होतो.

दरम्यान दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.  भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पीक विमा देत आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. यावर बिचकुले यांनी कोकाटे यांना देखील सुनावलं आहे.   त्यांनी जर शेतकऱ्यांचा अपमान केला असेल, तर मी त्याचा खरपूस समाचार घेणार असं बिचकुले यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;