सुरेश धस अन् आव्हाडांमध्ये पुन्हा जुंपली, लाँग मार्च ते अक्षय शिंदे सगळंच निघालं

सुरेश धस अन् आव्हाडांमध्ये पुन्हा जुंपली, लाँग मार्च ते अक्षय शिंदे सगळंच निघालं

मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. सुरेश धस यांनी पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यामध्ये भेदभाव करत नाही. लाँग मार्च निघाल्यापासून गेल्या 25 दिवसांमध्ये आव्हाडांनी एकदा तरी संर्पक केला आहे का? असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.

नेमकं काय म्हणाले सुरेश धस?

मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यामध्ये भेदभाव करत नाही. लाँग मार्च निघाल्यापासून गेल्या 25 दिवसांमध्ये आव्हाडांनी एकदा तरी संर्पक केला आहे का? जटील प्रश्नांमधून मार्ग काढण्यासाठी मी प्रयत्न केला, ती जर जूक असेल तर ती चूक मी केली. ज्या चिमुकलीवर बलात्कार झाला त्या आरोपीची वाह वाह करणारे तुम्ही आहात, अक्षय शिंदेंची वाह वाह करणारे कोणत्या मानसिकतेचे आहेत? असा हल्लाबोल सुरेश धस यांनी केला आहे.

पंकजा मुंडेंना टोला 

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं होतं.  मला आष्टीवर  जास्त प्रेम करावं लागेल, कारण परळी तिकडे राष्ट्रवादीला गेला आहे. मात्र हा मतदारसंघ आता भाजपकडे आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता सुरेश धस यांनी देखील या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला आहे. तिकडे सगळं हायजॅक झालं आहे, त्यामुळे आधी पंकजा मुंडे यांनी आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावं असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे अंजली दमानिया यांनी देखील सुरेश धस यांच्यावर आरोप केले होते. सुरेश धस यांनी युटर्न का घेतला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मात्र यावर बोलणं धस यांनी टाळलं आहे. दमानिया आणि अंधारे या माझ्या भगिनी आहेत, त्यामुळे मी त्यांचा आदर करतो असं धस यांनी म्हटलं आहे.  दरम्यान आता आव्हाड धस यांना काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;