पंतप्रधान नरेंद्र मोदी डुबकी मारतात, पण गणपतीचे विसर्जन करु देत नाही, हे तुमचे हिंदुत्व? उद्धव ठाकरे यांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी डुबकी मारतात, पण गणपतीचे विसर्जन करु देत नाही, हे तुमचे हिंदुत्व? उद्धव ठाकरे यांचा सवाल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली आहे. माघी गणेशोत्सवात राज्य सरकारने नोटिसा बजवल्या. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, एकीकडे महाकुंभ सुरु आहे. त्यात सर्वजण डुबकी मारत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डुबकी मारली. पण पीओपी गणेश मूर्त्यांचे विसर्जन होणार नाही, अशी नोटीस सरकार बजावत आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, एकीकडे कुंभ सुरू आहे सर्वत्र आहे तुम्हाला कोणाच्या भावना दुखवायचे नाही. दुसरीकडे गणपती मुर्त्या विसर्जन करु देत नाहीत इतका त्यांचे हिंदुत्व? मला गणपती मंडळांनी पत्र दिले. पीओपी मूर्ती असल्याने गणेश मूर्तींचे विसर्जन करू नका, असे पत्र आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान डुबकी मारतात ते चालते. पण मुर्त्या बुडवू देत नाहीत. मुंबईत ठिकठिकाणी मुर्त्या अशाच ठेवल्या आहेत. सर्व विभागप्रमुखांनी माहिती घ्या, किती ठिकाणी मुर्त्या विसर्जन करायच्या राहिल्या आहेत, मग ठरवू काय करायचे, असे ठाकरे म्हणाले.

शिक्षक कॉन्ट्रॅकवर नको…

शिक्षण प्रणालीसंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिक्षणात अमूलग्र बदल केला पाहिजे म्हणजे नक्की काय करायला पाहिजे, हे सांगितले जात नाही. पण शिकवणारा तज्ज्ञ असायला पाहिजे ना? तो कॉन्ट्रॅकवर भरला जात असले तर कसे चांगले शिकवणार? तुम्ही अभ्यास बदला अन्यथा काही करा पण शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे. पु. ल. देशपांडे यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे धरावे असे पाय आणि हार घालावे असे गळे कोणाचे नाहीत.

निकाल मान्य नाही…

विधानसभा निकालावरुन पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, विधानसभा निवडणूक आम्हाला अजूनही मान्य नाही. जाईल तिथे लोक हे कसे शक्य आहे? असा प्रश्न मला विचारत आहे. अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला तर अनेक लोक झोपेत उठून प्रतिक्रिया द्यायला आले. एवढ्या दिवस झोपलेले आता जागे झाले. हे दळभद्री सरकार काय काम करतय बघा. लाडकी बहीण योजना आणली. परंतु आता किती महिलांना डावलले जात आहे. योजना सांगितल्या त्या किती? आता सुरु आहेत किती? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;