मोठी बातमी! इयत्ता 12वीची परीक्षा उद्यापासून; निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

मोठी बातमी! इयत्ता 12वीची परीक्षा उद्यापासून; निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार आहे.  या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उद्यापासून बारावीची परीक्षा सुरू होणार असल्यानं या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

नेमकं काय म्हणाले गोसावी? 

बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार आहे.  या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा दहा दिवस आधी घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या. 10 दिवस आधी परीक्षा घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. निकालही लवकर जाहीर करणार आहोत, 15 मेपर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असेल असं शरद गोसावी यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार  37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले आणि 6 लाख 94 हजार 352 मुली आहेत. तर  37 ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत. या पैकी 7 लाख 68 हजार 967 विद्यार्थी विज्ञान शाखेची परीक्षा देणार आहेत. 3 लाख 80 हजार 410 विद्यार्थी कला शाखेची तर 3 लाख 19 हजार 439 विद्यार्थी वाणिज्य शाखेची परीक्षा देणार आहेत.

सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या अर्धा तास आधी केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वाढवून दिले जाणार आहेत, या आधी पेपरच्या आधी 10 मिनिटं वाढवून दिले जात होते, परीक्षा केंद्रावर गैर प्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे,  मदत करणारे यांच्यावर देखील पात्र आणि अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.  संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी ठेवली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाणार आहे. तसेच  प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएससह लाइव्ह ट्रॅकिंग, व्हिडीओ चित्रीकरणंही केलं जाणार असल्याची माहिती गोसावी यांनी दिली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;