‘सोलापूरकर तुम्ही बाबासाहेबांना अरेतुरे करता? शब्द मागे घे, नाही तर मी तुला झोडणार’; आव्हाड संतापले

‘सोलापूरकर तुम्ही बाबासाहेबांना अरेतुरे करता? शब्द मागे घे, नाही तर मी तुला झोडणार’; आव्हाड संतापले

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात अभिनेता राहुल सोलापूरकर याने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं. औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती, असं विधान अभिनेता राहुल सोलापूरकर याने केलं होतं. यानंतर सर्व स्थरातून संताप व्यक्त करण्यात आला, दरम्यान हा वाद ताजा असतानाच आता राहुल सोलापूरकर याने आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.  वेदांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते, असा जावई शोध राहुल सोलापूरकर याने लावला आहे. सोलापूरकर याने नवीन वादग्रस्त विधान करून पुन्हा एक वाद ओढवून घेतला आहे. राहुल सोलापूरकर याच्या या विधानानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत सोलापूरकरच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले आव्हाड? 

राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे , देशाचे वाटोळे केले आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही. आता तर डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलून सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. याच्या डोक्यावर नसलेले केस उगवावे लागतील; ते कसे उगवायचे, ते बहुजन अन् आंबेडकरवादी ठरवतील. या मनुवाद्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा का त्रास होतो, हेच समजत नाही. याला दिसेल तिथे तुडवा !! असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

 

‘एवढंच नाही तर सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना आरेतुरे बोलतात? आम्ही म्हणतो ते आमचे बाप आहेत. तु म्हणशील का ते माझे बाप आहेत. अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिलं. गप्प आपले शब्द मागे घे, नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेलं पण मी तुला झोडणार, मी तुला मारणार बाबासाहेबांचा आणि शिवरायांचा अपमान आम्ही नाही सहन करणार, असं देखील आव्हाड यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी देखील या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. राहुल सोलापूरकरचे तोंड चपलीने फोडा आणि 1 लाख बक्षीस मिळवा, अशी घोषणा शरद कोळी यांनी केली आहे. शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या सोलापूरकरला फोडून काढा,’ असं शरद कोळी यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;