‘माझा बाप जगातील सर्वोत्कृष्ट बाप, पण…’; पोटगीच्या निर्णयानंतर करुणा शर्मा यांच्या मुलाची भावनिक पोस्ट

‘माझा बाप जगातील सर्वोत्कृष्ट बाप, पण…’; पोटगीच्या निर्णयानंतर करुणा शर्मा यांच्या मुलाची भावनिक पोस्ट

मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे.  आता  वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयानं दिलेल्या या आदेशानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा 18 वर्षांचा मुलगा शिशीव धनंजय मुंडे याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत मोठा खुलासा केला आहे. त्याने आपली आई करुणा शर्मा यांच्यावरच आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

नेमकी काय आहे पोस्ट?   

‘मी शीशिव धनंजय मुंडे, मला आता बोलणे भाग आहे कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकले आहे. माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी तो आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हता. माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची.
जो घरेलू हिंसाचार तिच्यासोबत झाला असा ती दावा करते तो घरेलु हिंसाचार खरे तर मी, माझी बहीण व माझे वडील यांच्यासोबत तिच्याकडून व्हायचा.

माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक व मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेल्यावर तिने मला व माझ्या बहिणीला सुद्धा घर सोडून जायला सांगितले कारण तिच्या मते तिचा व आमचा ( जन्मदाती आई असुनही) काहीही संबंध राहिला नव्हता. 2020 या वर्षापासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेत आहेत. माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत तरीसुद्धा तिने घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाही असे जाणीवपूर्वक ठरवले आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्यानाट्या गोष्टी पसरवत असते.

शिशिव धनंजय मुंडे, अशी पोस्ट शिशिव मुंडे याने केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by seeshiv munde (@see.shiv)

नेमकं काय आहे प्रकरण? 

आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा दावा करुणा शर्मा यांनी केला होता. यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्या कायदेशीर लढाई लढत आहेत. या प्रकरणात करुणा शर्मा यांना मोठा दिलासा मिळाला असून न्यायालयानं धनंजय मुंडे यांनी दर महिन्याला करुणा शर्मा यांना दोन लाख रुपये द्यावेत असे आदेश दिले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;