वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर नितेश राणे पुन्हा संतापले, म्हणाले कशाला पाहिजे नाटकं….

वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर नितेश राणे पुन्हा संतापले, म्हणाले कशाला पाहिजे नाटकं….

राज्यात लवकरच दहावी, बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे, परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी परीक्षेला जाताना बुरख्यावर बंदी घालावी अशी मागणी करणारं पत्र काही दिवासंपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिलं होतं. मात्र नितेश राणे यांच्या या मागणीला विरोध होत आहे.  तसेच राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा देखील चांगलाच तापला आहे, या दोन्ही विषयांवर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. ते श्रीगोंदा येथे बोलत होते.

नेमकं काय म्हणाले नितेश राणे? 

जिहाद्यांचा या उन्माद आहे, त्यामुळे हिंदू समाजातील लोकांना धीर देण्यासाठी ताकद देण्यासाठी मी इथं आलो आहे. हे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे,  हिंदूंच्या ताकदीने हे सरकार स्थापन झालं आहे. या सरकारच्या काळात हिंदुवर झालेला अन्याय सहन करणार नाही, असा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला आहे.  दरम्यान सध्या राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा देखील चांगलाच तापला आहे. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी म्हटलं की,  ‘पीर बाबाची नाटकं कशाला पाहिजेत? पैगंबर यांना मानणारा मुळ मुस्लिम जमाज देखील पीर बाबाला मानतो का? वक्फ बोर्डाचा विषय आमच्याकडे आहे. ही आमची राज्य सरकार व केंद्र सरकारची भूमिका आहे’, असं राणे यांनी म्हटलं आहे.

लवकरच दहावी, बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे, परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी परीक्षेला जाताना बुरख्यावर बंदी घालावी अशी मागणी करणारं पत्र काही दिवासंपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिलं होतं. मात्र या मागणीला विरोध होत आहे, यावर देखील नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र दिलं आहे.
सरकार आमचं आहे, सरकारचा मी प्रतिनिधी आहे. आमचा कारभार हा पारदर्शक व्हावा असा आमचा प्रयत्न असल्याचं यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे. बांगलादेशी कीड देशात ठेवणार नाही, त्यांना जे दूध पाजणारे आहेत, त्यांनाही आम्ही ठेचू असंही यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;