उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार का? भुजबळांना कुठं करमतं; संजय शिरसाट यांचे स्फोटक विधान काय?

उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार का? भुजबळांना कुठं करमतं; संजय शिरसाट यांचे स्फोटक विधान काय?

गेल्यावेळी भाजप आणि एकसंघ शिवसेनेचे फाटले. त्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेले. तर पुढे शिवसेनेत उभी फुट पडली. शिंदे गट महायुतीसोबत गेला. अडीच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर महायुतीने विधानसभेत घवघवीत यश मिळवलं. काल-परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यानंतर हे दोघे एकत्र येण्याची चर्चा रंगली. दोन्ही गटातून त्यावर प्रतिक्रिया येत आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी यावर भाष्य केले.

उद्धव ठाकरे गटला सणसणीत टोला

या सर्व घडामोडींवर संजय शिरसाट यांनी सणसणीत टोला लगावला आहे. त्यांनी या सर्व चर्चेवर ठाकरे गटावर तोंडसुख घेतले आहे.
राजकारणात काही घडतही नाही आणि बिघडत नाही. उबाठा गटाच्या काही लोकांमध्ये उतावळेपणा आलेला आहे. त्यांना वाटतंय आपण आता कुठे तरी उडी मारली पाहिजे. म्हणून ते प्रयत्न करत आहेत. मग त्यांना देवेंद्रजी चांगलं काम करत असल्याचं आठवतं. सकाळी मोदीजी चांगलं काम करत असल्याचं सांगतात. संध्याकाळी वाटतं नाही करत. त्यांना फ्रस्टेशन आलेलं आहे. त्याचाच एक भाग आहे. कुठे जायचं हे गोंधळात ते आहेत. त्यांना कोणी स्वीकारायला तयार नाही हा महत्त्वाचा मुद्दा, असा टोला त्यांनी लगावला आहे.

ठाकरे-भाजप एकत्र येणार नाही

कालच फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की रिलेशन असणं वेगळं आणि राजकारण असणं वेगळं. त्यांची आमच्यासोबत युती होणं शक्य नाही असं फडणवीस म्हणाले, याची त्यांनी आठवण करुन दिली. काहीच होणार नाही. भाजप आणि शिवसेना एकत्र येणारच नाही. जे उठसूट रोज मोदींबद्दल अमित शाहांबद्दल घाण विधान करतात त्यांना भाजप कधीच स्वीकारणार नाही. हे तुम्हाला लिहून देतो, असे त्यांनी छातीठोकपणे सांगितले. तर शिंदे गट आणि ठाकरे गट सुद्धा एकत्र येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांची काही गरजच नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जाणार नाही. काही चान्स नाही, असे शिरसाट म्हणाले.

भुजबळांची अजितदादांच्या बैठकीला दांडी

भुजबळांना फडणवीस जवळचे वाटत असतील. म्हणून वारंवार बैठका होतात. वारंवार जातात. पण अजितदादांच्या बैठकीत त्यांना करमत नसावं म्हणून ते बैठकीला गेले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;