भुजबळ फडणवीसांच्या भेटीला, दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा; समोर आलं मोठं कारण

भुजबळ फडणवीसांच्या भेटीला, दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा; समोर आलं मोठं कारण

मोठी बातमी समोर येत आहे, आज पुन्हा एकदा माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. छगन भुजबळ यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ?

छगन भुजबळ यांनी आज सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.  त्यांनी अर्धा तास मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली, या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे. ‘ आज मी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो याच खरं कारण म्हणजे त्यांच्याकडे गृहमंत्रालय सुद्धा आहे, आणि आमच्या येवला पोलिसांना कवायत ग्राऊंडला भिंत टाकायची आहे, येवला पोलीस स्टेशनच्या पोलिसांसाठी घरं पाहिजे आहेत. आणि जादा पोलीस फोर्स पाहिजे. आमच्या इतर काही फायली देखील आहेत, उदाहरणार्थ आमच्या लासगाव कमिटीचं थोडं काम आहे. एस गाववरून आम्हाला येवल्याला पाणी आणायचं आहे त्याची फाईल आहे. हे मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी पडून आहे. त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. बाकी राजकारणावर चर्चा करण्याचं काही कारण नाही,  राजकारणावर काय चर्चा करणार? असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दर मंगळवारी राष्ट्रवादीची आढावा बैठक होते, या बैठकीबाबत देखील भुजबळांना विचारण्यात आलं. यावर बोलताना जीथे माझी गरज नाही तीथे मी जात नाही, असं म्हणत त्यांनी बोलण टाळलं. तसेच तुम्ही अजूनही नाराज आहात का? असा सवालही त्यांना यावेळी करण्यात याला, त्यावर बोलताना ते म्हणाले मी नाराज आहे की नाही, किती नाराज आहे. हे कसं सांगता येईल. त्याचं थर्मा मीटर मला अजून तरी मिळालेलं नाहीये, अशी मिष्कील टिपणी देखील यावेळी भुजबळ यांनी केली. मात्र राजकीय वर्तुळात या भेटीची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;