‘जात बदनाम होतीये, गुन्हे करायचे अन्…’; आव्हाडांचा पुन्हा एकदा मुंडेंवर हल्लाबोल

‘जात बदनाम होतीये, गुन्हे करायचे अन्…’; आव्हाडांचा पुन्हा एकदा मुंडेंवर हल्लाबोल

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं असून, राजकीय आरोप -प्रत्यारोप देखील सुरू असल्याचं पाहायला मिळत आहेत. आज पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘गुन्हा केल्यानंतर जाती आड का लपता? मी जातीवंत वंजारी आहे. माझ्या कुटुंबाने हमाली केली. तुम्ही आणि वाल्मिक कराड यांनी केलेल्या कृत्यामुळे जात बदनाम होत आहे,’ असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले आव्हाड?   

‘गुन्हा केल्यानंतर जाती आड का लपता? मी जातीवंत वंजारी आहे. माझ्या कुटुंबाने हमाली केली. तुम्ही आणि वाल्मिक कराड यांनी केलेल्या कृत्यामुळे जात बदनाम होत आहे, याच्यावर हल्ले झाले, त्याच्या हत्या झाल्या.   जा लोकांचा छळ झाला ते लोक वंजारी नाहीत का? तुम्ही लोकांचा छळ केला. तुम्ही लोकांना गुलाम केलं, त्यांना राजकारणासाठी वापरलं’ असा आरोप यावेळी आव्हाड यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पोलीस फक्त वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याशिवाय कोणाचं ऐकत नाही. असे तर इन्सपेक्टर आहेत. शासकीय यंत्रणा पोखरली जात आहे. खरा आका धनंजय मुंडे हेच आहेत. 11 वर्ष एकच पोलीस एका ठिकाणी कसा? आका आणि काका दोन्ही इथेच बसतात, काहीही होणार नाही, असा हल्लाबोल यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

दमानियांचा हल्लाबोल 

दरम्यान दुसरीकडे अंजली दमानिया यांनी देखील आज पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी पीसी घेतली. मला वाटेल ती नावे ठेवली. दमानिया नाही तर बदनामीया नावं ठेवलं. पुराविया ठेवलं असतं तर चाललं असतं. बदनाम लोकांचे मी पुरावे देते, त्यामुळे माझं काही नाव ठेवलं तरी मला फरक पडत नाही, बीडमध्ये जाऊन दादागिरी करायची, मामीची जमीन बळकवायची हे सगळं सुरू आहे, असा हल्लाबोल यावेळी दमानिया यांनी केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;