नॅनो युरिया, नॅनो डीएपीचा ८८ कोटींचा घोटाळा, अंजली दमानिया यांची आरोपांची लड, कृषी खात्यातील भ्रष्टचाराची वाचली यादी, धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत

नॅनो युरिया, नॅनो डीएपीचा ८८ कोटींचा घोटाळा, अंजली दमानिया यांची आरोपांची लड, कृषी खात्यातील भ्रष्टचाराची वाचली यादी, धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुरव्यानिशी आज राज्याच्या कृषी खात्याची अब्रू वेशिला टांगली. महायुती सरकारमध्ये गेल्यावेळी कृषी मंत्री धनंजय मुडे यांनी घोटाळ्याचा धडाकाच लावल्याचा मोठा आरोप त्यांनी केला. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी विविध घोटाळ्याची मालिकाच समोर आणली. एकामागून एक यादीच वाचून दाखवली. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे कृषी विभागाची लक्तरं टांगल्या गेली. त्यांनी आता तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार की नाही असा सवाल केला.

घोटाळ्याची मालिका

नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यामध्ये घोटाळाच घोटाळ झाल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या. आता तरी भ्रष्टाचार समोर आला आहे. भगवानगडाने त्यांचा पाठिंबा काढून घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.

भ्रष्टाचार म्हणतो, पण तो किती पट झाला हे दिसेल. या सर्वांचे दर दाखवते.
नॅनो युरिओ आणि नॅनो डीएपी या इफको नावाच्या कंपनीचे आहेत. नॅनो युरिया १८४ पर लिटर दर आहे. म्हणजे ५०० मिलिलीटरच्या बॉटलला ५०० रुपये मिळतात. पण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं. ती २२० रुपयात घेतली गेली. सिंगल बॉटल बाजारात ९२ रुपयाला मिळते. पण मुंडे यांनी १९ लाख ६८ हजार ४०८ बॉटल या २२० रुपयाने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किंमतीने बॉटल घेतल्या, असा आरोप दमानिया यांनी केला.

आता नॅनो डीएपी, याची किंमत ५२२ रुपये एक लिटर. म्हणजे ५०० मिलिलीटरला ही केवळ २६९ रुपयाला मिळते. एकूण बॉटल घेतल्या १९ लाख ५७ हजार ४३८ बॉटल घेतल्या. त्याचा बाजार भाव २६९ रुपये. कृषी मंत्र्यांनी ५९० रुपयाला खरेदी केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यासाठी घाई-घाईने स्वाक्षरी केल्याचा आरोप दमानिया यांनी केला.

नॅनो डीएपी, नॅनो युरियाचा घोटाळा ८८ कोटींचा

बॅटरी स्पेअर हा टु इन वन आहे. एमएआयडीच्या वेबसाईटवर हा स्पेअर मिळतो. तो २४५० रुपयाला मिळतो. एमएआयडीच्या वेबसाईटवर २९४६ रुपयाला विकला जातो. कृषी मंत्र्यांनी टेंडर काढलं. ते ३४२६ रुपयाला ही बॅटरी विकत घेतली. एक हजाराच्या वर एक एक बॅटरी स्पेअर कमावले. म्हणजे ५ लाखाहून अधिक लाभार्थी होणार होते. बजेट फिक्स होते. लाभार्थी कमी केली. २ लाख ३६ हजार ४२७ बॅटरी स्पेअर घेतले. किंमत होती ३४२५ रुपये होती.

मेटाल्डे हाईड गोगलगायीचा प्रादूर्भाव झाल्याने कापूस आणि सोयीबीनचं नुकसान होतं. मेटाल्डे हाइड हे पीआयए कंपनीचं पेटेंटेड प्रोडक्ट आहे. बल्कमध्ये घेतल्यावर स्वस्त मिळतं. रिटेलमध्ये आता या प्रोडक्टचा दर ८१७ रुपयाला मिळतंय. पण कृषी मंत्री मुंडेंनी १२७५ रुपयाला विकत घेतलं. एकूण १ लाख ९६ हजार ४४१ किलो विकत घेतलं.

कॉटन स्टोरेज बॅग ६ लाख १८ हजार घेतल्या. काही दिवसापूर्वी आयसीएआय नावाची संघटना आहे. त्यांनी २० बॅगा घेतल्या. ५७७ रुपयाला. पण मुंडेंनी टेंडरमधून १२५० रुपयाला घेतल्या. ३४२ कोटीच्या टेंडरमध्ये १६० कोटी रुपये सरळ सरळ गेले. मी ऑनलाइनच्या रेटने म्हणतेय. बल्कने पकडलं तर २० टक्के अधिक आहे. इतके महान कृषी मंत्री आहेत. एकच वर्ष पदावर होते. एका वर्षात या व्यक्तीने अफाट पैसा खाल्ला असेल तर त्यांना मंत्रीपदावर ठेवण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी गंभीर विचार करावा, अशी मागणी दमानिया यांनी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;