BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज होणार सादर, बेस्टला किती अनुदान मिळणार ?

BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज होणार सादर, बेस्टला किती अनुदान मिळणार ?

मुंबई महापालिकेचा 2025-206 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज, 4 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी आज काय मोठ्या घोषणा केल्या जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच मुंबईतील बेस्ट प्रशासनाला काय मिळणार याकडेही सर्वांच्या नजरा आहेत. या प्रकल्पात पायाभत सुविधांकडे लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. सध्याचे कर दरही सुधारित केले जाणार का याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. महापालिकेने रस्ते, पूल, पाणीपुरवठा प्रकल्प, पर्जन्य जलवाहिन्यांसह अन्य कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. या कामासांठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची महापालिका ही सर्वात श्रीमंत समजली जाते, त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे अनेकांचं लक्ष असतं.

महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी सकाळी 11 वाजता पालिका मुख्यालयात पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईचा अर्थसंकल्प सादर होणार असून त्याला बरंच महत्व आहे.

बेस्टला काय मिळणार ?

आज सादर केला जाणाऱ्या पालिकेच्या 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून बेस्टला काय मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. महापालिकेचा एक उपक्रम असलेल्या बेस्टला या अर्थसंकल्पात किती कोटींचे अनुदान मिळणार याकडे सर्व मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी अर्थसंकल्पात 2132 कोटींची तूट असून ती भरून काढण्यासाठी महापालिकेकडून अनुदान मिळेल या गृहीतकावर बेस्टने अर्थसंकल्प तयार केला आहे. मात्र मुंबई महापालिका प्रशासन किती निधी देणार त्यावर बेस्टचे भवितव्य अवलंबून आहे.

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्ट उपक्रमाचे विद्युत पुरवठा आणि परिवहन विभाग असे दोन विभाग आहेत. त्यापैकी विद्युत पुरवठा हा विभाग नेहमी नफ्यात असतो. मात्र परिवहन विभाग गेली अनेक वर्षे तोट्यात असून ही संचित तूट जवळपास आठ हजार कोटींवर गेली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प बेस्ट उपक्रमाने नोव्हेंबर महिन्यात सादर केला. बेस्टने 9439 कोटींचा अर्थसंकल्प तयार केला असला तरी त्यात 2132 कोटींची तूट असून महापालिकेकडून अनुदान मिळेल या अपेक्षेवर हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. नवीन गाड्या खरेदी करण्यासाठी पालिकेकडून अनुदान मिळेल या गृहीतकावर हा अर्थसंकल्प बेतलेला आहे. मात्र महापालिका बेस्टला किती अनुदान देणार यावर बेस्टचा आर्थिक डोलारा अवलंबून आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;