मोठी बातमी! एकनाथ शिंदे पुन्हा नाराज? फडणवीसांच्या बैठकीला दांडी, नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! एकनाथ शिंदे पुन्हा नाराज? फडणवीसांच्या बैठकीला दांडी, नेमकं काय घडलं?

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलं, महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र गेल्यावेळी देवेंद्र फडणीस हे उपमुख्यमंत्री होते. तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत तर एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहेत. नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वी एकनाथ शिंदे हे नाराज होते, त्यामुळे ते आपल्या मुळगावी दरेगावला गेल्याची चर्चा रंगली, त्यानंतर पालकमंत्रिपदावरून देखील एकनाथ शिंदे नाराज झाल्याची माहिती समोर आली होती, त्यावेळी देखील ते दरेगावला गेले होते. दरम्यान आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे, त्याचं कारण देखील समोर आलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंनी बोलावलेल्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित नव्हते. त्यानंतर आता त्यांनी फडणवीसांनी बोलावलेल्या आणखी एका महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मात्र एकनाथ शिंदे या बैठकीला हजर नव्हते. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीनं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या बैठकीला हजेरी लावली.

दरम्यान यापूर्वी देखील पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद मिळावं अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती. मात्र नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन तर रायगडचं पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना मिळालं. त्यामुळे शिंदे नाराज झाल्याची माहिती समोर आली होती. ते त्यानंतर आपलं मुळगाव असलेल्या दरेगावला गेले होते. शिंदेंच्या नाराजीनंतर या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली. दरम्यान आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे फडणवीसांनी बोलावलेल्या कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहिले, त्यानंतर बोलावलेल्या या महत्त्वाच्या बैठकीला देखील त्यांनी दांडी मारल्यानं पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;