आता छगन भुजबळ राज्यपाल होणार का? स्पष्टपणे भुजबळांनी दिले उत्तर

आता छगन भुजबळ राज्यपाल होणार का? स्पष्टपणे भुजबळांनी दिले उत्तर

Chhagan Bhujbal Interview: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ चर्चेत असतात. मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांनी जाहीर विरोध केल्यानंतर मनोज जरांगे यांच्या संतापाचे लक्ष्य भुजबळ ठरले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे ते पक्षाविरोधात जाहीरपणे वक्तव्य करत आहे. त्याचवेळी पुण्यातील मुलाखतीतून भुजबळ यांनी भाजपसोबत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले. मग त्यांना राज्यपाल म्हणून संधी मिळाली तर ते जाणार का? यावर भुजबळ यांनी स्पष्टपणे नकार दिला. राज्यपाल होणे म्हणजे तोंडाला कुलूप लावणे आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची आज जाहीर प्रकट मुलाखत पुण्यात घेण्यात आली. जाधवर इंस्टिट्यूट मध्ये सुरू असलेल्या युवा संसद कार्यक्रमात भुजबळ यांची मुलाखत झाली. त्यामध्ये त्यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत तर दिले पण राज्यपाल होण्यास नकार दिला.

छगन भुजबळ राज्यपाल होणार का? त्यावर बोलताना ते म्हणाले, राज्यपाल होणे म्हणजे तोंडाला कुलूप लावण्यासारखे आहे. ते खूप मोठे पद आहे. मी त्या पदाचा अवमान करत नाही. पण माझे काम गोर गरिबांचे कल्याण करणे आहे. राज्यपाल झालो तर भटक्या विमुक्त जातीसाठी मी काही करू शकत नाही. यामुळे मी सध्या आहे, तसाच बरा आहे.

कोणता नेता चांगला…

नेतृत्व म्हणून अजित पवार यांच्यासंदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले, अजित पवार हे चांगले आहेत. पण शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आणि अजित पवार यांच्यात जो फरक आहे, तो आहे. मनोज जरांगे यांच्या विरोधासाठी तुमचा वापर केला का? यावर भुजबळ म्हणाले, माझा वापर कोणी करु शकत नाही. आरक्षणासाठी मी गोरगरीब जनतेसाठी लढलो आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारांची घरे जाळली. त्यानंतर मी मैदानात उतरलो. राजीनामा देऊन मी त्या लढाईत उतरलो होतो. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भुमिका घेतली त्याचा फटका मला मतामध्ये बसला. महायुतीला जे यश मिळाले, त्यात ओबीसींचा मोठा वाटा आहे.

त्या आरोपींना तशीच शिक्षा करा?

बीडच्या प्रकरणात संतोष देशमुख यांना मारले ते अमानुष आहे. राक्षस सुद्धा असा प्रकार करणार नाही. सोमनाथ सूर्यवंशी यांना मारले ते अमानुष आहे. या व्यक्तीच्या जातीऐवजी माणूस म्हणून पाहिले पाहिजे. त्यांना मारणाऱ्यांना त्याच पद्धतीने शिक्षा करायला हवी, असे भुजबळ यांनी म्हटले.

हे ही वाचा…

छगन भुजबळ यांनी प्रथमच स्पष्टपणे दिले या पक्षासोबत जाण्याचे संकेत, पुढील वाटचाल…

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;