उद्धव ठाकरे यांचे पुन्हा भाजपाशी मनोमिलन?, पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात चंद्रकांत पाटील यांची घेतली भेट

उद्धव ठाकरे यांचे पुन्हा भाजपाशी मनोमिलन?, पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात चंद्रकांत पाटील यांची घेतली भेट

राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आल्यानंतर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जातीने भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीकडे राजकीय निरीक्षकांनी पुढील राजकारणाचे संकेत मिळत असल्याचे म्हटले होते. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि भाजपाचे नेते एकाच मंचावर आले आहेत. त्याचे झाले काय भाजपाचे नेते पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त उद्धव ठाकरे वधूवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी पोहचले तेव्हा भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांची गुफ्तगू झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो ही उक्ती नेहमीच खरी ठरत आली आहे. राज्याचे मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची आज एका लग्न सोहळ्यामध्ये भेट झाली आहे. भाजपाचे विलेपार्ले येथील आमदार पराग अळवणी यांच्या कन्येच्या लग्नसोहळ्यात उभयंतात भेट झाली आणि राजकारणावर चर्चा देखील झाल्याचे म्हटले जात आहे. चंद्रकांत पाटील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. शिवसेनेने देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर नेहमीच कठोर टीका केली होती. त्यामुळे हे दोन्ही नेते एकाच ठिकाणी भेटल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.

भेटींचा सिलसिला

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पराग अळवणी यांच्या कन्येचा विवाह सोहळा होता. त्यानिमित्ताने शिवसेना नेते उद्धव ठाकरे वधू-वरांना शुभार्शीवाद देण्यासाठी पोहचले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर आणि विनायक राऊत हे देखील होते. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना देखील चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट देखील चर्चेत आली होती. भाजपाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची विधानभवनातील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. एकमेकांना कायम पाण्यात पाहाणारे दोन्ही नेते त्रयस्थ सोहळ्यात एकत्र येऊन एकमेकांशी गप्पा मारु लागल्याने राजकारणात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे पुन्हा भाजपाशी हस्तांदोलन करतात की काय ? याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;