मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झाले तर हेच बिल्डर्स दोषी असतील, झिशान सिद्दीकी यांचा आरोप

मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झाले तर हेच बिल्डर्स दोषी असतील, झिशान सिद्दीकी यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील त्यांच्या कार्यालयासमोरच बिष्णोई गँगच्या गुंडानी हत्या केली होती. त्यानंतर या प्रकरणात कोर्टात चार्जशिट दाखल करण्यात आली आहे.या आरोपपत्रावरुन त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केले आहेत. आपण ज्या बिल्डर्सची संशयित म्हणून नावे घेतली होती. त्यातील एकाचीही मुंबई पोलिसांनी साधी चौकशी देखील केलेली नाही. उद्या माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर या लोकांनी हल्ले केले तर पोलिस बिल्डर्सना पुन्हा निर्दोष सोडतील अशी मला खात्री आहे असे बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी याने म्हटले आहे.

झिशान सिद्दीकी पुढे म्हणाले की मी नेहमीच सांगितले की, ज्या पद्धतीने चौकशी होत आहे. तसे काही झालेले नाही. मी अर्धी चार्जशीट वाचली आहे. मी निराश झालो आहे. ज्या पद्धतीने चौकशी झाली त्यावर मी निराश आहे. आम्ही अनेक नावं घेतली होती, आम्ही जी जी नावे घेतली होती, त्या नावांची चौकशी केली नाही. गोळीबार करण्यापूर्वी स्मोक बॉम्ब फुटला होता असं सांगितलं जाते. पण हे भेकडाचं काम आहे. समोर उघडपणे हल्ला करणार नाही. हे मर्दांचं काम नाही. भेदरलेल्या लोकांचे कृत्य आहे. आणखी काय होणार ? माझ्याही जीवाला धोका आहे. जास्तीत जास्त  काय करतील मला मारतील. माझ्या कुटुंबाला आणि माझ्या केसालाही धक्का लागला तर मी जी जी नावे घेतली आणि काही बिल्डरांचीही नावे घेतली ते सर्व याला जबाबदार असतील आणि पोलिस त्यांना देखील निर्दोष सोडतील अशी भीतीही सिद्दीकी यांनी व्यक्त केली.

पोलिसांना कोर्टात उत्तर द्यावे लागेल ?

मी ज्यांची नावे घेतली, ती सर्व नावे पोलिसांकडे आहेत. पण मला आश्चर्य याचं आहे की पोलिसांनी यापैकी कुणाचीही साधी चौकशी केलेली नाही. त्याचे उत्तर पोलिसांना कोर्टात द्यावे लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यांचे उत्तर द्यावं लागेल. पोलिसांनी या लोकांची चौकशी का केली नाही असं सीएम विचारतील. मी काही आमदार नाही. त्यामुळे माझं सरकार नाही. मी एक कार्यकर्ता आहे. मला जे वाटतं ते मी माझे नेते अजितदादांना सांगेल. सीएम, अजितदादा, एकनाथ शिंदे हे चांगली चौकशी करतील असे वाटते. माझ्या जीवाला धोका झाला तर त्याला बिल्डरच जबाबदार असेल. मी पोलिसांना सांगितलं. आता जर चौकशी होत नसेल तर मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेची खिल्ली उडवल्यासारखं होईल असेही झिशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;